ट्राफिक करतोय रिक्शावाला!!तर मुजोर रिक्षा चालकाची मनमानीने शहरवासी बेजार!!
रोखठोक न्युज वार्ताहर
शहरात बेशिस्त रिक्षाचालकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. केज शहरात पंचायत समीती गेट,कानडीरोड चौक,बस स्टॅंड समोर,मंगळवार पेठ काॅर्नर, या ठिकाणी रिक्षा थांबा आहेत,तसेच खेड्यापाड्यातून प्रवासी रिक्षावाले वेगळेच. रिक्षाचालक रस्त्यांत अचानक थांबून प्रवाशांची चढउतार करत आहेत. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत असून अपघातही होत आहेत. रिक्षाचालक अधिक दराने भाडे आकारणी करीत आहेत.त्यातल्या त्यात काही रिक्षा वाले फक्त रात्री रिक्षा चालवतात,रात्री पहाटे जे प्रवासी प्रवास करूण आलेले असताता त्यांच्या कडून तर अडवून खुप मोठे भाडे आकारले जाते.किती तरी रिक्षे आहेत ज्यांच्या कडे ना परमीट आहेना रिक्षा चालवण्याचा परवाना.त्यांची भाषा तर एकदम गुंडाला लाजवेल अशी आहे.जर ये रिक्षा भाडे घेऊन निघले असतील तर बरोबर रस्त्याच्या मधोमध चालणार,पाठी माघून हाँर्न द्या किंवा ढोल नगाडे वाजवा साईड देणार नाहीत म्हणजे नाहीत आणि मध्येच ब्रेक दाबणार रिक्षा थांबवून प्रवासी उतरवणार किंवा घेणार.यांच्या कडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.केज शहरात रिक्षाचालकांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरातील चौकाचौकात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. यामुळे इतर वाहनचालकांना वाहतुकीस त्रास होत आहे. रहदारी असलेल्या चौकाचौकात रिक्षाचालकांची गर्दी पाहायला मिळत आहे. प्रवासी घेण्यासाठी रिक्षाचालकांमध्ये स्पर्धा लागली आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यांमध्येच प्रवाशांची चढउतार होत आहे. याचा नाहक त्रास इतर प्रवाशांना सोसावा लागत आहे.सकाळी उपजिल्हा रुग्णालया समोर तर अस्ताव्यस्त रिक्षा लावलेले असतात कितीही गंभीर रूग्ण आला तरी त्यांना त्याची तमा नसते.रूग्णवाहिका येऊ किंवा काय पुर्ण रूगणालयाच गेट यांनी अडवलेल असत.पुन्हा भाड्या साठी रोजच कोणा न कोणा बरोबर चिकचिक चालूच.पोलीस प्रशासन ने यावर लक्ष घालावे असे आता जनतेतून बोलले जात आहे.
