• Mon. Jun 22nd, 2026

उमरीरोड राष्ट्रीय प्रश्न होण्या आगोदर कोणी तरी लाजल पाहिजे.

Bybaba maske

Apr 27, 2023

उमरीरोड राष्ट्रीय प्रश्न होण्या आगोदर कोणी तरी लाजल पाहिजे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहरातील उमरीरोड हा गेल्या दहा बारा वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आहे.हा प्रश्न घेऊन गेल्या बारा वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले या वर आवाज उठवत आले आहेत.त्यानी या बरोबरच काही केज शहरातील प्रश्ननान वर आवाज उठवून वेळो वेळी अंदोलने केली आहेत.तसेच केज नगरपंचायत ची दोन वेळेस निवडणूक सुद्धा लढवली आहे.पण त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला उमरीरोड चा प्रश्न काही मार्गी लागेना.सतत 100 ते 150 निवेदन व 50 च्या जवळपास या रस्त्या साठी त्यांनी अंदोलन केली आहेत.गेल्या 13 महिन्या पुर्वी नगरपंचायत ची निवडणूक झाली त्यात आज सत्तेत असलेल्या जनविकास परिवर्तन आघाडी कडुन हनुमंत भोसले यांनी निवडणूक लढवली ते त्यांचा त्यात पराभव झाला.पण त्यांचा पक्ष निवडून येऊन सत्तेत बसला..पण त्याच सत्ताधारी गटाने मार्च 2021 ला उमरीरोड साठी आलेला 98 लक्ष रूपयाचा निधी दडवून ठेवला व शेवटी वर्तमानपत्रात याचा पर्दाफाश झाल्या नंतर ते केज च्या नागरिकांना कळाला. नगरपंचायत निधी का दडवून ठेवला व आपल्याच पक्षाच्या टिकीटा वर निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्या पासुन ते शहरातील जनते पासुन का दडवून ठेवला? हे एक गौडबंगालच आहे.त्यांनतर ही हनुमंत भोसले यांनी अंदोलन केल तिथे ही अश्वासना पलीकडे काहीच भेटल नाही.त्या नंतर केज मतदार संघातील आमदार नमिताताई यांनी नगरोत्थान योजनेतून उमरीरोड साठी निधी मंजूर करून आणला.गेल्या काही महिण्या पुर्वी नगरपंचायत ने लाखोंचा खर्च करून वाजत गाजत कार्यक्रम घेऊन उद्घाटन सोहळा केला पण अजून ही उमरीरोडचे काम काही केल्या चालू झाले नाही.त्यानंतर आरपार ची लढाई म्हणून 24/4/2023 वार सोमवार पासून हनुमंत भोसले यांनी केज नगरपंचायत समोर घंटानाद अंदोलन करत होते आज अंदोलनाचा तिसरा दिवस होतो.आज पुन्हा नगरपंचायतने येत्या 1/मे/2023 पासुन उमरीरोड चे काम चालू करू काही तांत्रिक अडचण असल्या मुळे काम करण्यात अडथळा आहे असे आश्वासन देऊन अंदोलन माघे घेण्याची विनंती केली व अंदोलन माघे घेतले असे जाहीर झाले. पण गेल्या वर्षी मार्च ला आलेला 98 लाखाचा निधी तसेच नगरोत्थान योजनेतून 2 कोटीचा आलेला निधी,ऐवढा निधी येऊन ही उमरीरोड का होत नाही?98 लाख रूपयाचे निधीचे टेंडर होऊन हे काम राज कन्स्ट्रक्शन ला भेटले आहे.मग हे काम चालू का होत नाही?हे काम कमिशन साठी अडवले आहे का?असे आता जनतेतून बोलले जात आहे.त्यामुळेच उमरीरोडचा राष्ट्रीय प्रश्न होण्या आगोदर कोणी तरी लाजा आणि काम चालू करा असे जनतेतून बोलले जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!