चालत्या बसमधून महिलेचे बारा तोळे सोन्याचे दागिने लंपास
रोखठोक न्युज वार्ताहर
मुलाला भेटून लातूरहून अंबाजोगाईला परत निघालेल्या वृद्धेची साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि ३२ हजारांची रोख रक्कम ठेवलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी बसमधून लंपास केली. चोरीची ही घटना गुरुवारी (दि. १८) सकाळी बस अंबासाखर कारखाना येतेह आली असता उघडकीस आली.
चित्ररेखा दगडुसाहेब खंदारे (रा. पोखरीरोड राजमाता नगर, अंबाजोगाई) यांचा मुलगा राहुल हे शिक्षणासाठी सध्या लातूर येथे वास्तव्यास आहेत. राहुल यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना भेटून चित्ररेखा या गुरुवारी सकाळी लातूर – कल्याण बसने अंबाजोगाईला निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी पाटल्या, गंठन, अंगठ्या, झुंबर आदी जवळपास साडेबारा तोळे सोन्याचे दागिने आणि ३२ हजार रुपये रोख रक्कम असलेली बॅग सतःच्या पायाजवळ ठेवली होती. वाटेत अज्ञात चोरट्याने त्या बॅगमधील सर्व ऐवज लांबवला. बस अंबासाखर कारखाना येथे आली असता चित्ररेखा यांनी बॅग तपासल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले असे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. स्द्फ फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
