महावितरणच्या कनिष्ठ अभियंता सहित खाजगी व्यक्ती लाचलुचपत च्या जाळ्यात.
रोखठोक न्युज वार्ताहर
विहीरीच्या फाईलमधील नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी परळी येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यासह खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. बीडच्या एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
किरण जयवंत निंबाळकर (वय २९ वर्ष, पद- कनिष्ठ अभियंता, महावितरण कार्यालय, उपविभाग परळी, रा. बँक कॉलनी, परळी ता. जि. बीड), शाहनिक दत्तात्रय अनुसे, ( वय ३५ वर्ष, व्यवसाय – खाजगी काम, रा. रेवली ता. परळी जि. बीड) असे लाचखोरांची नावे आहेत. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या वडिलांचे व साक्षीदारांच्या भावाचे नावे असलेल्या शेतामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत अल्प भुधारक शेतकरी सिंचन विहीरीच्या फाईलमधील नाहरकत प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी आरोपी लोकसेवकाने पंचासमक्ष खाजगी इसमाचे मार्फतीने लाचेची मागणी लाच रक्कम खाजगी इसमामार्फत स्वीकारण्याचे मान्य केले. खाजगी व्यक्तीने ३००० रूपयांची मागणी करून तडजोडीअंती फाईलवर सही घेऊन देण्यासाठी स्वतःसाठी २०० रुपये व लोकसेवकासाठी ५०० असे तीन फाईलचे प्रत्येकी ७०० रुपयांप्रमाणे २१०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. पडताळणीअंती हा प्रकार लक्षात ही कारवाई पोलीस उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांच्यासह श्रीरा गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेशउपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र परदेशी यांच्यासह श्रीराम गिराम, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, गणेश म्हेत्रे आदींनी केली.
