• Sun. Apr 19th, 2026

कुमावत साहेबांचा धाक संपला की काय? गणेशाच्या अशिर्वादाने मटका केज तालुक्यात जोरात!!

Bybaba maske

Jun 12, 2023

कुमावत साहेबांचा धाक संपला की काय? गणेशाच्या अशिर्वादाने मटका केज तालुक्यात जोरात!!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्याला एएसपी पंकज कुमावत यांची नियुक्ती झाली आणी दोन नंबर वाल्याचे वासे फिरले.कुमावत यांच्या जोरदार,धडक कारवाई ने दोन नंबर वाल्याने आपले मटके,गुटखे,पत्याचे क्लब सगळे गुंडाळून गायब झाले.कुमावत साहेबांचा कारवाईचा तडाखा पुर्ण जिल्हाभरात झाला.अधुन मधुन साहेब सुट्टीवर गेले तरच थोडी फार हालचाल दिसत असे पण आता राज रोस मटका चालू झाला आहे.प्रत्येक गल्ली बोळात,फंटर लोक मटका घेत असल्याचे दिसून येत आहे.आता पंर्यत धाडी पडल्या की फंटर अटक होतात,त्याचे बाॅस त्यांची जामीन करून घेतात आणि पून्हा जैसे ती परिस्थिती.जो पर्यंत या बाॅस वर कारवाई होत नाही तो पर्यन्त हा धंदा असाच जोमात चालणार कारण आज पंर्यत जेवढ्या कारवाया मटका गुटखा यांच्यावर झाल्या त्यात सरदार कधी सापडलेच नाही फंटर लोंकानवर कारवाई झाली व सोडून दिले.त्याच मुळे सरदारांना भिती राहीली नाही.त्यामुळे सरदार धारिष्ट वाढत गेल.गरिब फंटर वर कुठ पंर्यत कारवाई करणार त्याचा रोज किती 500 रूपय बाकिची कमाई सरदारांचीच. कुठ पंर्यत गोरगरीब लोंकाचे संसार उद्ध्वस्त होणार साहेब? काहीतरी ठोस कारवाई करा हो…अशी हाक गोरगरीब जनतेतून निघत आहे…

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!