• Sun. Apr 19th, 2026

केज तालुक्यात कृषि दुकानदार जास्तीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांचे खिसे कापू लागले…अधिकारी लोकप्रतिनिधी आणि स्वयंघोषित शेतकरी नेते झोपले का….  

Bybaba maske

Jun 13, 2023

केज तालुक्यात कृषि दुकानदार जास्तीचे पैसे घेऊन शेतकऱ्यांचे खिसे कापू लागले…अधिकारी लोकप्रतिनिधी आणि स्वयंघोषित शेतकरी नेते झोपले का….

 

रोखठोक न्युज वार्ताहर 

जून महिना सुरू होऊन दहा दिवस उलटले आहेत शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे आटोपून खते बी बियाणे आपल्या घरी आणायला सुरुवात केली आहे . मात्र केजक तालुक्यातील कृषी दुकानदार खते व बी बियाणे वाढीव किंमत घेऊन भरमसाठ शेतकऱ्यांना लुटत आहेत शेतकऱ्यांची लूट सुरू असून देखील तालुका कृषी अधिकारी तहसीलदार आणि लोकप्रतिनिधी गाढ झोपेत असतानाचे चित्र सध्या तरी केजन तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यात वाढीव दराने होणारी खत आणि. बियाणांची विक्री आणि शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी, शेतकऱ्यांना मागेल तेवढे खत बी बियाणे उपलब्ध करून द्यावेत जास्तीचे पैसे घेऊ नये असे सर्व सामान्य शेतकऱ्याला सध्या तरी वाटत आहे. तर राजकारणी शेतकरी पुत्र तसेच स्वतःला शेतकरी नेते म्हणून घेणारे कोणत्या बिळात लपले. आहेत हे तरी सध्या सांगणे कठीण झाले आहे. कालच महाराष्ट्र राज्यात मान्सून चे आगमन झाले आहे. शेतकरी कसे बसे पैसे गोळा करून खते बी बियाणे आणण्यासाठी तालुक्याला जात आहे मात्र तालुक्यातील दुकान दारांचे अव्वाच्या सव्वा भाव ऐकून शेतकरी परत आपल्या घरी निघून येत आहे. तर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी तालुक्यात आहेत की कुठ आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर आहेत हे काही कळायच्या मार्ग नाही. अश्या पावसाच्या तोंडावर अधिकाऱ्यांनी झोपेचे सोंग घेणे कितपत योग्य आहे असे सर्व सामान्य शेतकऱ्यांच्या तोंडून निघत आहे.

 

चौकट

शेतकरी नेत्यानो, लोकप्रतिनिधींनो, आणि अधिकाऱ्यांनो जीवाला काही वाटू द्या.

स्वयंघोषित शेतकरी पुत्र, स्वयंघोषित शेतकरी नेते लोकप्रतिनिधी आणि तुमचा बाप खरंच शेतकरी असेल तर अश्या लुटा लुटीच्या काळात तरी तुमच्या जीवाला काही वाटू द्या अश्या संतप्त भावना शेतकऱ्यांच्या मुखातून निघत आहेत.

चौकट

शेतकऱ्यांनी खते बी बियाणे घेत असताना त्या दुकानदारांकडून आपला माल घेतल्यानंतर पक्के बिल आपल्या ताब्यात घेवून जर त्यात तफावत आढळून येत असेल तर मंडळ कृषि अधिकारी किंव्हा तालुका कृषि अधिकारी यांच्या कडे लेखी स्वरूपात तक्रारी कराव्यात त्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल असे आवाहन तालुका कृषि अधिकारी देशमाने यांनी केले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!