• Sun. Apr 19th, 2026

न्यायालयाचा आदेश असताना उमरीरोड च्या अतिक्रमणा कडे पंचायत समितीचे दुर्लक्ष. 

Bybaba maske

Jun 15, 2023

न्यायालयाचा आदेश असताना उमरीरोड च्या अतिक्रमणा कडे पंचायत समितीचे दुर्लक्ष. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज पंचायत समितीच्या हद्दीत येत असलेले उमरीरोड रोड चे अतिक्रमण गेल्या पंचवीस वर्षा पासून आहे.या ठिकाणी धनदांडगे लोकांनी खोट्या रजिस्ट्री करून आपल्या नावावर जागा केल्या आहेत.याचा वाद अंबाजोगाई सत्र न्यायालयात चालु होते गेल्या दोन महिन्या पुर्वीच पंचायत समितीच्या बाजूने निकाल लागला असतानाही अधिकाऱ्यांच्या बोटचेपी भुमीके मुळे अतिक्रमण उठवले नाही.हा एक प्रकारे न्यायालयाचा अपमान आहे का?का आर्थिक तडजोडी वर अतिक्रमण धारकान वर मेहरबानी आहे?असे आता जनतेत बोलले जात आहे.आज पंर्यत अश्याच अधिकाऱ्यांच्या तडजोडीने केज शहराचे बकालीकरण झाले आहे.आता गेल्या 20 वर्षा नंतर केज शहरातील उद्या अतिक्रमण काढले जाणार आहे.मग या धनदांडग्यांचे अतिक्रमण न काढता गोरगरीब लोकांच्या ज्याचे की हातावर पोट आहे अश्या लोकांवर अन्याय का?त्या बरोबर केज पंचायत समितीने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे व उमरीरोड चे अतिक्रमण काढावे असे उमरीरोड च्या रहिवाशांकडून मागणी केली जात आहे.या बाबत केज पंचायत समितीच्या प्रभारी बीडीओ शेप मॅडम यांच्याशी संपर्क साधला आसता, त्यानी पटेल व कराड यांचा फोन नंबर दिला पण दोघांचाही मोबाईल बंद अढळुन आला.त्या मुळे संशय जास्त वाढला आहे कारण प्रशासकीय पातळीवर केज शहरातील अतिक्रमण मोहीम काही तासावर आली असता उमरीरोड चे अतिक्रमण थंड बस्तयात आहे.या वर जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार करण्याचा मनोदय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!