• Sat. Apr 18th, 2026

गायरान जमिनींच्या सातबाऱ्यावर येणार अतिक्रमण करणाऱ्यांची नावेएकही अतिक्रमण हटविले जाणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वंचितच्या मोर्चाला आश्वासन

Bybaba maske

Jul 21, 2023

 गायरान जमिनींच्या सातबाऱ्यावर येणार अतिक्रमण करणाऱ्यांची नावे

एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे वंचितच्या मोर्चाला आश्वासन

रोखठोक न्युज वार्ताहर 

 राज्यभरातील गायरान जमिनींवर झालेले एकही अतिक्रमण हटविले जाणार नाही, असे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला गुरुवारी दिले. गायरान जमिनीच्या सातबाऱ्यावर ज्यांचे अतिक्रमण आहे, त्यांची नावे लावण्याची प्रक्रिया तहसीलदारांमार्फत राबवण्यात येणार असल्याचेही फडणवीस म्हणाले.

राज्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण धारकांना सरकारने नोटीस बजावल्या आहेत. ३५८ तालुक्यातील २ लाख ४७ हजार अतिक्रमणधारकांना सरकारने नोटीस काढल्या आहेत. भटके विमुक्त तसेच अनेक गोरगरीब नागरिकांना बेघर होण्याची भीती यातून निर्माण झाली. या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीचा प्रचंड मोर्चा गुरुवारी धडकला. मेट्रो सिनेमापासून दुपारी १२च्या दरम्यान निघालेला हा मोर्चा महापालिका मुख्यालयाजवळ सभेत रूपांतरित झाला. हा मोर्चा सुरू ठेवून अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री फडणवीस यांना भेटले.

वंचित आघाडीने रखडलेल्या एसआरए प्रकल्पांचाही प्रश्न मांडला. मुंबईत रखडलेल्या एसआरए प्रकल्पांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. विकासक भाडे देत नसल्याने दागदागिने विकून, कर्ज काढून भाडे भरावी लागत आहेत याकडे अॅड. आंबेडकर यांनी लक्ष वेधले. जे एसआरएचे प्रकल्प रखडले आहेत, ज्या ठिकाणी बिल्डर रहिवाशांना घरभाडे देत नाहीत ते प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय सरकार घेईल, असेही फडणवीस यांनी गायरान जमिनीवरच्या अतिक्रमित जमिनींवरच्या सांगितले  या जमिनींवरची घरे पाडण्यात येणार नाहीत.असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. या मोर्चामध्ये रेखा ठाकूर, अशोक सोनवणे  अंजली आंबेडकर, निलेश विश्वकर्मा, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे, बीड जिल्वंहाध्चियक्ष शैलेश कांबळे तांच्या युवक, महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी नाहीत,  उपस्थित होते.

गुरुवारी भायखळा येथून हा मोर्चा निघणार होता. मात्र मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहतुकीत अडथळा होऊ नये म्हणून मेट्रो येथून मोर्चा काढण्यात आला. सुमारे २५ हजारावर कार्यकर्ते या मोर्चात लोक सहभागी झाले होते.

मोर्चामध्ये शीतल साठे, मेघानंद जाधव या लोककलावंतांनी आंबेडकरी चळवळीची गाणी गाऊन वातावरण भारावून टाकले.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!