• Sun. Apr 19th, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण : तरुणा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Bybaba maske

Jul 31, 2023

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण : तरुणा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- अल्पवयीन मुलीस लग्नाची मागणी घालूनही मुलिचे लग्न लावून देत नसल्याने त्या मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून घेऊन गेल्या प्रकरणी तरुणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील एका १५ वयाच्या अल्पवयीन मुलीस चार महिण्या पूर्वी उमेश आश्रुबा केदार (रा. नामेवाडी ता. केज) याने लग्नाची मागणी घातली होती. मात्र ती अल्पवयीन असल्याने लग्न करून देण्यास तिच्या पालकांनी नकार दिला होता. मात्र लग्नास नकार दिल्या पासून उमेश केदार हा तिची छेड काढीत असे आणि तिला पळवून नेण्याची धमकी देत होता. २९ जुलै रोजी सकाळी १०:०० वा. च्या सुमारास त्या अल्पवयीन मुलीचे आई-वडील हे दोघे शेतात कामास गेले होते आणि अल्पवयीन मुलगी एकटीच होती. दुपारी ३:०० वा.च्या सुमारास उमेश केदार याने तिला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेऊन तिचे अपहरण केले. सायंकाळी ५:०० वा.च्या सुमारास तिचे आई- वडील घरी आले. त्यांना मुलगी घरी दिसून न आल्याने त्यांनी नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र तिचा तपास लागला नाही. शेवटी उमेश याच्या घरी जाऊन त्याची माहिती घेतली असता तो घरी नसल्याचे दिसून आले. त्या नंतर त्याने या मुलीचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करीत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारी वरून उमेश केदार याच्या विरुद्ध केज पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!