• Fri. Sep 11th, 2026

राजकारणाची झिंग चढलेला युवक ऐवढा षंढ कधी झाला? दुष्काळाच सावट चुली पंर्यत आले तरी झेंडे नाचवण्यात मश्गुल.

Bybaba maske

Sep 1, 2023

राजकारणाची झिंग चढलेला युवक ऐवढा षंढ कधी झाला? दुष्काळाच सावट चुली पंर्यत आले तरी झेंडे नाचवण्यात मश्गुल.

बाबासाहेब मस्के:-  रोखठोक न्युज

राजकारण्यानी अक्षरशा युवक नासवला आहे.राजकारणाची झिंग ऐवढी चढली आहे की दुष्काळाची आग चुली पंर्यत आली तरी हा षंढ होऊन मिरवणुकीत,सभेत ताटली,बाटलीवर नाचत सुटलाय. आर्धी पेरणी वाया गेली आर्धी जायच्या मार्गावर आहे.खिशात खुळखुळणारा पैसा आटणार आहे.अश्या परिस्थितीत महाराष्ट्राचा शेतकरीवर्ग,युवक सगळे कसे शांत आहेत.केंद्र सरकार चे सहा हजार, महाराष्ट्र राज्य काय तरी देईल व पीकविमा काही येईल.ऐवढीच अपेक्षा राहिल्यात का इथल्या शेतकरीवर्गाला?ऐवढे आळशी बनवलय “रेवड्या” वाटून ह्या सरकारने…महाराष्टात झालेली राजकारणाची खिचडी,त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती.आता  आम्हीच कसा खरा पक्ष याच्या नावे गावोगावी शक्तिप्रदर्शन करत आहेत, त्या साठी फुकट गाडी,फुकट दारू, फुकट जेवण, व त्यावर चर्चा या पलीकडे युवकाकडे काही काम नाही.

माझा दादा माझा भाऊ, माझी ताई,माझा आण्णा,आजून पंर्यत बांधावर आले नाहीत. पंधरा दिवसांनी एक एक शेतकरी आत्महत्या करेल तेंव्हा काय होईल?

या वेळेस तर पिण्या साठी पाणी राहील का नाही हे सांगता येणार नाही.एवढी परिस्थितीत गंभीर आहे.आगोदर नेते दुष्काळा दौरे काढायचे, बांधा,बांधावर जायचे.शेतकरीवर्गाचे सांत्वन करत फिरायचे.गेल्या महिन्यांपासून परिस्थितीत एवढी बिकट झाली असताना एक ही पुढारी बांधावर शेतकऱ्यांच सांत्वन करताना दिसून येत नाही.सरकारअसंवेदनशील  झाले आहे.युवकाचे राज्यकर्त्या कडून वशीकरण झाले आहे.मग हा लढाई चा झेंडा कोण हाती घेईल?

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!