• Sun. Sep 20th, 2026

आयपीएस पंकज कुमावत यांची दंबग कारवाई.  गुटखा माफियाला सापळा रचुन शिताफिने घेतले ताब्यात. 

Bybaba maske

Nov 29, 2023

 आयपीएस पंकज कुमावत यांची दंबग कारवाई. 

गुटखा माफियाला सापळा रचुन शिताफिने घेतले ताब्यात

रोखठोक न्युज वार्ताहर 

महाराष्ट्रा शासन प्रतिबंधीत गुटख्याची बेकायदेशिर विक्री व वहातुक करणारा बीड जिल्हा पोलीसांना चकमा देणारा फरार गुटखा माफिया महारुद्रा ऊर्फ आबा नारायण मुळे, रा. बीड यास अपर पोलीस अधिक्षक, श्री. पंकज कुमावत यांनी घेतले ताब्यात

दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी अपर पोलीस अधिक्षक, श्री. पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पोलीस ठाणे दिंद्रुड गु.र.नं. २०५/२३, पोलीस ठाणे सिरसाळा२२१/२०२३,२२२/२०२३, पोलीस ठाणे नेकनुर गु.र.नं. २८०/२०२३, २८९/२०२३, पोलीस ठाणे धारुर गु.र.नं. ३०४/२०२३ या गुन्हयात तसेच बीड जिल्हयातील पोलीस स्टेशनमधील ब-याच गुन्हयात फरार आरोपी नामे महारुद्रा ऊर्फ आबा नारायण मुळे, रा. बीड हा बऱ्याच दिवसापासुन पोलीसांना चकमा देवुन फरार असलेला आरोपी हा केज येथे आल्याची गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन मा. अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी सदर अरोपीस ताब्यात घेणे बाबत पोउपनि पाटील , शमीम पाशा, त्रिंबक सोपने व पुजा माके यांना आदेशित केल्याने सदर पथक सापळा रचुन शासकीय विश्रामगृह केज समोर दबा धरुन थांबले असता, यातील आरोपी नामे महारुद्रा मुळे ऊर्फ आबा मुळे आला व पोलीस पथकास पाहताच जोरात पळुण जात असतांना पोउपनि पाटील साहेब, शमीम पाशा, त्रिंबक सोपने व पुजा माके यांनी त्यांचा पाठलाग

करुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. सदरची कारवाई श्री.नंदकुमार ठाकुर, पोलीस अधिक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक श्री.पंकज कुमावत साहेब यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, पोलीस अंमलदार शमीम पाशा, त्रिंबक सोपने, पुजा माके यांचे टिमने यांनी केली आहे.

baba maske

Related Post

विलास घुले हत्या प्रकरणाला नवा ट्विस्ट; CIDच्या 200 पानी चार्जशीटमध्ये खासदार सोनवणेंच्या मुलाचे नाव नाही! केज न्यायालयात दहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल; 15 सप्टेंबरला CIDची कारवाई
फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!