खासदार प्रितमताई मुंडे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार कुठ पंर्यत सांभाळणार.
3 कोटी 67 लाखाचा रस्ता 3 महिन्यांत उखडला.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील सांगवी(सां) येथे सि आर एफ केंद्रीय मार्ग निधी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या लोकार्पण सोहळा पार पडला खा. डाॅ.प्रितमताई मुंडे याानी पाठ पुरावा करून आणलेला निधी व त्याचे त्यानी लोकार्पण सोहळा 27 तारखेला झाला पण प्रितमताई तुम्ही आज सांगवी ते केळगाव बेळगाव रस्त्याच्या लोकार्पण सोहळा उद्घाटन केले तेथील प्रविण कंट्रक्शन या गुत्तेदाराने केलेल्या कामाची पाहणी तरी करायची प्रवीण कंट्रक्शने केळगाव बेळगाव रस्ता केला आहे त्या रस्त्याची सध्याची दुरावस्था तुम्ही लोक लोकार्पण सोहळा करण्या अगोदरच रस्त्याची दुरावस्था झालेली आहे या रस्त्याला जवळपास 3 कोटी 67लाख रुपयाचा निधी दिला आहे तरी या रस्त्याचे काम पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचे झाले आहे
प्रितमताई तुम्ही तुमच्या भाषणांमध्ये रात्री सांगितलं की मी निधी दिला आहे मग या रस्त्याची जबाबदारी पण माझीच आहे मंग आता या रस्त्याची जबाबदारी कधी घेणार आणि त्या गावातील नागरिकांना तुम्ही न्याय कधी देणार हे पण सांगा?
तालुक्यातील केळगाव बेलगाव रस्ताचे काम निकृष्ट झाले असुन नागरीकातून कठोर भावना व्यक्त होत आहे तर नागरिकांचे म्हणने आहे की रस्त्याच्या मजबुतीकरण डांबरीकरणासाठी 3 कोटी 67लाख रु मंजुरी असून चार वर्षांपासून नियोजित रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून रस्त्याचे काम पूर्ण होऊन तीन महीने झाले आहे जर तिन महिन्यात असे हाल होत असतील तर भविष्यात या रस्त्याचे काय होईल. तरी हे काम प्रवीण कंट्रक्शन मार्फत झालेले आहे तरी समस्त नागरिकांचे असे म्हणे आहे की या निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या प्रवीण कंट्रक्शने जाणिव पुर्वक निकृष्ट दर्जाचे काम केले आहे तरी प्रवीण कंट्रक्शनला काळ्या यादीत टाकण्यात यावे असा नागरिकांचे म्हणणे आहे. .