• Fri. Apr 24th, 2026

जलजिवनसाठी विनापरवाना रस्ता खोदला कंत्राटदार वॉप्कोसला सहा लाखाचा दंड.चिंचोली माळी ते टाकळी, चिंचोलीमाळी सातेफळ. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता  युवराज मळेकर मात्र दंडात्मक कारवाई करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ

Bybaba maske

Dec 30, 2023

जलजिवनसाठी विनापरवाना रस्ता खोदला कंत्राटदार वॉप्कोसला सहा लाखाचा दंड.चिंचोली माळी ते टाकळी, चिंचोलीमाळी सातेफळ.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता  युवराज मळेकर मात्र दंडात्मक कारवाई करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ

रोखठोक न्युज वार्ताहर 

जिल्हा परिषद बीड अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उप-विभाग पंचायत समिती केज यांच्याकडे सदरील रस्ता खोदुन ठेवल्या प्रकरणी बाप्कोस कंपनीला दंड केला आहे याबाबत सविस्तर माहीती अशी की, जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत चिंचोली माळी ते केज चिंचोली माळी –

सातेफळ व चिंचोली-टाकळी रस्ता खोदून नुकसान केले म्हणुन दंड केला आहे. श्री. गलांडे जयदत्त कल्याणराव रा. चिंचोली माळी ता. केज यांनी दि.५ जुन २०२३ रोजी तक्रार केली होती. त्या अनुषंगाने उप- अभियंता केज यांचे पत्र क्रं. ग्रापापुउपविके/ तां.शा./कावि/६८/२०२३ दि.१८ आगष्ट २०२३ चे पत्र तसेच श्री. सासवडे व्हि एम. शाखा अभियंता बांधकाम उपविभाग केज यांचा अहवाल दि.४ आगष्ट २०२३ यांच्या पत्राची दखल घेऊन या आदेशात म्हटले आहे की, मौजे चिंचोली माळी ते टाकळी, चिंचोलीमाळी सातेफळ ता. केज या रस्त्यावर जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग केज यांच्या मालकीच्या रस्त्यावर सदर

कार्यालयाची पूर्व परवानगी न घेता सदर रस्त्याचे साईड बर्म वर अनाधिकृत खोदकाम करुन पाईपलाईन टाकलेली आहे. त्यामुळे सदर रस्त्याचे खोदकाम करुन नुकसान झालेले आहे. करीता सदर रस्ता दुरुस्ती करण्याकरीता आपल्यास खालीलप्रमाणे दंड आकारण्यात येत आहे. जेणे करुन सदर दंडातून सदर जलजिवनसाठी विनापरवाना रस्ता खोदला तो रस्ता दुरुस्त करुन घेण्यात येईल, सदर दंड खालीलप्रमाणे आहेत चिचोली माळी ते टाकळी रस्ता ४,५०,०००, चिचोली माळी ते टाकळी रस्ता २,२५,००० असा एकुण ६,७५,००० दंड केलेला आहे. करीता, वरील प्रमाणे दंड आपण जिल्हा परीषद बीड यांचे मुख्य लेखा विभागात भरण्याकरिता सदर कार्यालयातुन चलन घेवून जावे व सदर दंड आपण भरण्यास विलंब केल्यास आपल्यावर प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. असे सदरील पत्रात म्हटले आहे.

चिंचोलीमाळी ते केज हा रस्ता सार्वजनिकबांधकाम विभागा अंतर्गत येत असुन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. युवराज मळेकर मात्र दंडात्मक कारवाई करण्यास जाणिवपूर्वक टाळाटाळ करत आहेत. – जयदत्त (बाळासाहेब) गलांडे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!