रिल स्टार ‘वैशुलकी’ यांच्याकडून प्रसिद्धीचा गैरवापर? वैष्णवी चव्हाण व लखन चव्हाण विकतात औषधी
आयुर्वेदिकउपचारांच्या नावाखाली गजकर्ण, नायटा, सोरासिस सारख्या गंभीर आजारवर उपचाराची देतात खात्री.
रोखठोक न्यूज वार्ताहर
सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले ‘वैशुलकी’ या नावाने ओळखले जाणारे व्यक्ती सध्या आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली उपचार सेवा देत असल्याचे समोर येत आहे रासायनिक गंधक व खोबरेल तेल मिसळून एका डबीत भरून विकत आहेत तसेच या औषध आहे म्हणवणाऱ डबी बरोबर अरोग्यवर्धिनी म्हणून कुठलेशी गोळी देतात व गजकर्ण, नायटा व सोरायसिश सारखा गंभीर आजार ठिक होतो याचा दावा करतात.तसेच हे औषध फक्त तिन दिवसात रिजल्ट देतो असा दावा करतात.गंधक आणि खोबरेल तेल टाकून जर त्वचारोग निट झाले असते तर डाॅक्टरांची गरज काय?
सोशल मीडियावर वेग वेगळ्या रिल करून प्रसिद्ध झाले,हे जोडप पैश्याच्या हव्याशा पाई लोंकाच्या जिवाशी खेळायला लागले,या साठी त्यांच्या कडे कुठलेच वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसताना असे बनावट फर्जी औषध विकुच कसे शकतात,मात्र, त्यांच्या वैद्यकीय पात्रतेबाबत आणि अधिकृत नोंदणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सोशल मीडियावरील लोकप्रियतेचा वापर करून काही लोक उपचारासाठी आकर्षित केले जात आहेत. मात्र, संबंधित व्यक्तीकडे शासनमान्य वैद्यकीय परवाना आहे की नाही, याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.
आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, कोणताही उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांची नोंदणी व पात्रता तपासणे अत्यंत आवश्यक आहे. चुकीच्या उपचारांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो.
या प्रकरणाची आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करावी व यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
