• Fri. Sep 11th, 2026

नवे पार्टनर, नवे जाळे—केजमध्ये मटका माफियांचा उघड उच्छाद. गणेश खराडे जेलमध्ये, फंटर मैदानात—मटका धंद्याला सुवर्णकाळ. एक मुंडक कापलं, तीन उगवली! केजमध्ये मटका रॅकेट अधिकच बळावलं.

Bybaba maske

Feb 8, 2026

नवे पार्टनर, नवे जाळे—केजमध्ये मटका माफियांचा उघड उच्छाद.

गणेश खराडे जेलमध्ये, फंटर मैदानात—मटका धंद्याला सुवर्णकाळ.

एक मुंडक कापलं, तीन उगवली! केजमध्ये मटका रॅकेट अधिकच बळावलं.

रोखठोक न्यूज वार्ताहर

मटका किंग गणेश खराडे याला एमपीडीए अंतर्गत कारागृहात रवानगी झाल्यानंतर केज शहर व तालुक्यातील मटका धंदा बंद होईल, अशी सर्वसाधारण भावना होती. मात्र रावणाच्या मुंडक्यांप्रमाणे एक संपले की दुसरे उगवते, याच पद्धतीने मटका धंदा पुन्हा नव्या रुपात फोफावल्याचे चित्र दिसत आहे.

गणेश खराडे कारागृहात गेल्यानंतरही त्याच्या फंटरांच्या नेतृत्वाखाली स्माईल करून मटका धंदा पूर्वीप्रमाणेच जोमात सुरू आहे. एवढेच नव्हे तर आता या धंद्याला आणखी दोन नवे पार्टनर मिळाल्याने मटका पूर्णपणे तेजीत आला आहे.

पोलीस प्रशासनाने कारवाई करूनही ‘रावणाची मुंडकी’ कमी होण्याचे नाव घेत नाहीत. जोपर्यंत या वाढणाऱ्या मुंडक्यांवर—म्हणजेच नव्या पार्टनरवर—थेट कारवाई होत नाही, तोपर्यंत केज शहर व तालुक्यातील मटका धंदा बंद होणार नाही, हे वास्तव आहे.

आतापर्यंत गणेश खराडे याचा एकतर्फी अमल होता. तो कारागृहातूनही फंटरांच्या माध्यमातून मटका धंदा चालवत होता. मात्र आता दोन नवे पार्टनर मिळाल्यानंतर हा अवैध व्यवसाय अधिकच बळावला आहे. असे असताना पोलीस प्रशासन इतके अनभिज्ञ कसे राहू शकते, असा सवाल उपस्थित होत आहे.

एका बाजूला गरिबांचे संसार उद्ध्वस्त होत असताना, मटका थांबला असे वाटत असतानाच तो पुन्हा तेजीत येतो, ही गंभीर बाब आहे. रावणाची ही मुंडकी वाढण्याआधीच ठेचली गेली, तरच या अवैध धंद्यावर खरा अटकाव होईल, अशी चर्चा आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!