• Wed. Jun 3rd, 2026

केज नगरपंचायत ला मुख्यधिकारी टिकेना,उत्कृष गुटे यांची बदली

Bybaba maske

Feb 3, 2024

केज नगरपंचायत ला मुख्यधिकारी टिकेना,उत्कृष गुटे यांची बदली.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज नगरपंचायत तसेच अंबाजोगाई नगरपरिषदेचे  मुख्यधिकारी उत्कृष गुटे यांची बदली उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सह आयुक्त म्हणून झालीआहे.त्यामुळे केज नगरपंचायत ला सिओ राहिला नाही.गेल्या अडीच वर्षांच्या जनविकास आघाडी सत्तेत आल्या पासून नगरपंचायतला कर्मचारी काम करण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्या कारणावरून येथे न अधिकारी काम करण्यास तयार आहेत ना कर्मचारीवर्ग.सहा,सात महिन्याच्या कालावधीत येथे दोन मुख्याधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.या आगोदर मुख्यधिकारी म्हणून महेश गायकवाड आले होते पण त्यानी सहा महिन्यात आपली बदली करून घेतली. तसेच कार्यालयीन अधीक्षक यांनी ही आपली बदली केली आहे. नगररचनाकार यांना सत्ताधारी नगरसेवकानेेच धक्काबुक्की केली होती पण ते आपसात मिटवले होते.सद्या पाणीपुरवठा विभाग,कार्यालयीन अधीक्षक नगररचनाकार असे महत्त्वाचे विभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या मुळे रिक्त आहे अश्यातच उत्कृष गुटे यांची बदली झाली आहे.आता त्यांचे जागे कोण येत की ही सुद्धा जागा रिक्त रहाते हे पहावे लागेल.या सगळ्या रिक्त जागेमुळे केज विकास व नागरिकांच्या कामावर परिणाम होत आहे.सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहिला नाही.नागरिकांनी भरलेल्या टॅक्सच नेमक काय होतय याची चौकशी झाली पाहिजे हे आता जनतेतून बोलले जात आहे.कारण नागरिकांच्या पैश्याच काय होतय काही कळत नाही.कारण कुठलेच काम नगरपंचायत कडून चालू नाहीत जे कामे आहेत ते आमदार नमिताताई यांनी आणले आहेत.बाकी नगरपंचायत म्हणजे ठण ठण गोपाल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!