मोठी बातमी! भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या बॉडीगार्डचा शिंदे गटाच्या शहरप्रमुखावर गोळीबार
रोखठोक न्युज वार्ताहर
जुन्या वादातून हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच गायकवाडांनी चार गोळ्या झाडल्या
उल्हासनगर येथे भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटात मोठा राडा झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या बॉडीगार्डने शिंदे गटाच्या कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात पोलिसांसमोरच त्यांनी हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे.
महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड जन्या वादाच्या प्रकरणातून उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यात गेले होते. ते वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी चर्चा करत असतानाच भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या बॉडीगार्डने महेश गायकवाड यांच्या दिशेने चार गोळ्या झाडल्या. त्यातील दोन महेश गायकवाड यांना तर दोन त्यांचे मित्र राहुल पाटील यांना लागल्या आहेत. जखमी गायकवाड आणि पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, आमदार गायकवाड आणि खासदार श्रीकांत शिंदेंचे समर्थक, माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या टोकाचा वाद होता. यापूर्वीही त्यांनी जाहीर सभांतून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. टीका टिप्पणीनंतर एकमेकांची उणीदुणी काढण्यापर्यंत हा वाद पोहोचला होता. आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नव्हे तर सायको टेस्ट करण्याची गरज आहे, अशी टीकाही शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी केली होती.
