शरद झाडगे सह पाच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या
रोखठोक न्युज वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाने काल महसूल विभागातील उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यातील पाच उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई शरद झाडगे यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. माजलगावच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना, परळीच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, भुसंपादन जा.प्र.बीडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती भारती सागरे, विशेष भुसंपादन अधिकारी ल.पा. बीडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती कविता जाधव, यांचा बदल्यांमध्ये समावेश आहे. दरम्यान, भुसंपादन जा.प्र.बीडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती भारती सागरे यांच्या जागी श्रीमती संगिता राठोड यांची तर विशेष भुसंपादन अधिकारी ल.पा. बीडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती कविता जाधव यांच्या जागी सतिष धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने येथे दिली नियुक्ती माजलगावच्या उपविभागीय अधिकारी श्रीमती निलम बाफना यांची उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री येथे, श्रीमती नम्रता चाटे यांची विशेष भुसंपादन अधिकारी नांदेड, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांची उपविभागीय अधिकारी निलंगा, लातूर या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपजिल्हाधिकारी कविता जाधव व भारती सागरे यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.
