• Sun. Apr 19th, 2026

मोटार सायकल ट्रक अपघातात दोनजण जागीच ठार

Bybaba maske

Feb 4, 2024

मोटार सायकल ट्रक अपघातात दोनजण जागीच ठार

रोखठोक न्युज वार्ताहर 

माजलगाव कडून गढी कडे जाणारा ऊस वाहतूक करणारा ट्रक व गढी कडून माजलगावच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन या अपघातात मोटरसायकल वरील दोघे जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. माजलगाव – गढी रोडवर माऊली फाटा (हारकी लीमगाव) येथे ऊस वाहतूक करणारा ट्रक व दुचाकीचा अपघात झाला. यामधे दुचाकीवरील भागवत उर्फ पप्पु सुभाष इंगळे (वय २२ वर्षे) व मालन सुभाष इंगळे (वय ४७ वर्षे) रा.राजेगाव या माय लेकराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडलीरविवारी सायंकाळी 6:30 च्या सुमारास माजलगाव येथून उसाने भरलेला ट्रक हा गेवराई कारखान्याकडे जात असताना गडी कडून माजलगावच्या दिशेने निघालेल्या मोटरसायकल वरील दोघेजण चालकाचा तोल सुटल्याने झालेल्या अपघातात मोटरसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक खालून मोटरसायकल तसेच मृत व्यक्तीला काढण्यासाठी मोठे प्रयास करावे लागेल.

दरम्यान हा अपघात एवढा भीषण होता की मोटर सायकलचा चक्काचूर झाला असून ट्रक चालक फरार झाला आहे आणि अद्यापही मृतांची ओळख पटली नसून माजलगांव येथील ग्रामीण रुग्णालयात हरवले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!