अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी लॉजच्या खोल्यांचा वापर.
अत्याचाराच्या एकाच दिवशी दोन घटना.
ओळखपत्राशिवाय लॉजवर प्रवेश
रोखठोक न्युज वार्ताहर
वडवणी परिसरात चार दिवसांपूर्वी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. जास्तीचे पैसे देताच हॉटेल, लॉजचालक टवाळखोर, अल्पवयीन मुलांना प्रवेश देतात. चार दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या घटनांवरून अत्याचाराच्या गुन्ह्यासाठी हॉटेल, लॉजचा वापर होत असल्याचे उघडकीस आले आहे.अश्या लाॅज चा वापर सरास शहरात पर्यायी पुर्ण जिल्यात होत आहे.लाॅज मालकांवर कोणाचाच अंकुश नाही.लाॅज ही अवैध धंद्याच केंद्रबिंदू ठरत आहेत.
केज शहरात किंवा परिसरात ओळखपत्राशिवाय लॉज मिळतो. लॉजचालक खोली देताना कसलीही चौकशी करत नाही. दोन पैसे जास्तीचे देताच लॉज, हॉटेलचालक खोली उपलब्ध करून देतात. त्यामुळे टवाळखोरांना गुन्हे करण्यासाठी जांगा होते. यावरून लॉजचालक नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून येते.
लॉजचालकांकडून नियमाची कडक अंमलबजावणी झाल्यास अत्याचारासारख्या घटना घडणार नाहीत. लॉजवर अशा घटना घडतात. लॉजचालकांनी नियमांचे पालन करावे, अशी मागणी होत आहे.
वडवणी शहरात यापूर्वीही अत्याचाराच्या एकाच दिवशी दोन घटना
वडवणी येथील एका हॉटेल व लॉजवर २ फेब्रुवारीला सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील आरोपी फरार आहेत. याप्रकरणी वडवणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.
