• Thu. Oct 29th, 2026

मराठा समाजाच्या अमरण उपोषणकर्ते यांचा सत्कार समारंभ संपन्न! 

Bybaba maske

Feb 5, 2024

मराठा समाजाच्या अमरण उपोषणकर्ते यांचा सत्कार समारंभ संपन्न! 

रोखठोक न्युज वार्ताहर

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथे दि.४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्मथनार्थ केज तालुक्यातील अनेक मराठा बांधवांनी अमरण उपोषन केले व मराठा योद्धे मनोज जरांगे पाटील यांना पाठबळ दिले व संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश आले आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांना पाठबळ देणाऱ्या केज तालुक्यातील अमरण उपोषणकर्ते हनुमंत भोसले सर केज यांचा सन्मान अमर घोडके व माजी सरपंच सुनील देशमुख यांनी केला तसेच सतीश कुंडलीक शिंदे जानेगाव यांचा सन्मान दत्ता गलांडे व लक्षीमन गलांडे यांनी केला तसेच दिंगाबर श्रीहरी तपसे चंदनसावरगाव यांचा सन्मान महादेव हुंबे, जालिंदर हुंबे यांनी केले तसेच बालासाहेब जगताप कळबअंबा यांचा सन्मान अजित गलांडे यांनी केला तसेच पत्रकार रोहन गलांडे चिंचोली माळी यांचा सन्मान दिंगाबर मगर व विठ्ठल मगर यांनी केला याच सगळ्या उपोषणकर्तेना मान सन्मान मिळाला पाहिजे म्हणून चिंचोली माळी चे माजी सरपंच सुनील बापु देशमुख यांनी तालुक्यातील अमरण उपोषणकर्ते यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेतला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक सुरेश तात्या पाटील, जेष्ठ पत्रकार तथा जेष्ठ समाजसेवक हनुमंत भोसले सर, समाज प्रबोधनकार योगेश आंबाड, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे लक्षीमन तात्या गलांडे, सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे युवराज मगर,माजी सरपंच सुनील देशमुख, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ गलांडे,रवी गायकवाड,अमर घोडके, दत्ता गलांडे, राजाभाऊ मोठे, संदीप काटे, तसेच मुंबई रॅलीत सहभागी असणारे दत्ता गलांडे, अजित गलांडे, रोहन गलांडे,बालु हुंबे,आबा हुंबे, जालिंदर हुंबे, विकास हुंबे यांचा सुध्दा या कार्यक्रमात सन्मानीत करण्यात आले अशाप्रकारे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी ग्रामस्थ सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते व अशा प्रकारे मराठा आरक्षणासाठी केज तालुक्यातील उपोषणकर्ते यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!