• Wed. Aug 26th, 2026

शेअरमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ११ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक.

Bybaba maske

Feb 6, 2024

शेअरमध्ये नफ्याचे आमिष दाखवून ११ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक.

रोखठोक न्युज वार्ताहर 

शेअर मार्केटच्या साइटवरून व्हॉट्सअॅप ग्रुपवर जाहिरात करून जास्त नफ्याचे आमिष दाखवून सेनल महेंद्र मिश्रा (रा. विठाईपुरम, केज) या शिक्षकाला ११ लाखांना गंडविले. बीड येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या शिक्षकाला पाच विविध क्रमांकाच्या मोबाइलवरून संपर्क करून सेक्युआ या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या नावाखाली नफ्याचे आमिष दाखवून वेळोवेळी विविध बँक खात्यावर भरणा करण्यास सांगून मिश्रा यांची ११ लाख ९ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली. १३ ऑक्टोबर ते २६ डिसेंबर २०२३ दरम्यान हा गुन्हा घडला. तपास सायबर ठाण्याचे उपनिरीक्षक शैलेश जोगदंड करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!