तुकडा संस्कृती जपणाऱ्या नगराध्यक्षाच्या वॉर्डातील काम निर्मनुष्य ठिकाणी पळवले.
जनविकासच्या सर्वेसर्वाने शहरात तुकडा संस्कृती जोपासतात.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज शहरात जनविकास चे सर्वेसर्वा म्हणून घेणारे हारून इनामदार जे वार्ड क्रमांक 6 मध्ये मोठ्या मताधिक्यांनी जनतेने नाकारले.तेच पुन्हा स्वीकृत सदस्य म्हणून प्रवेश केला यांनी शहरात तुकडा संस्कृती जोपासली आहे.काही कार्यकर्ते,नगरसेवक तेच काय तर नगराध्यक्ष सुद्धा या तुकडा संस्कृतीचे पाईक झाले आहेत.तुकडा फेका आपले काम करा. कार्यकर्त्याला दारू,मटन तर नगरसेवकाला त्यांच्या इनामी जमीनीत अडचणी दुर करण्याचे अश्वासन कारण जनविकास आघाडीच राजकारण हे फक्त नातेवाईकाच्या व दलित वार्डाच्या पुढे कधी सरकलच नाही.यांची सत्ता तेंव्हाच येते जेंव्हा नगराध्यक्ष पद राखीव असेल त्यानंतर याचा रोल नगरपंचायत मध्ये संपतो.पण याना नगरपंचायत का महत्त्वाची आहे कारण यांच्या सकट सगळे निवडून आलेले नगरसेवक हे करोडोची इनामी जमीन असलेले.याचे काम शहरात इनामी जमीनवर प्लांटीग पाडने व विकणे या इनामी जमीनीत काही अडचणी असतेल तर नगरपंचायत मध्ये सत्ताधारी होऊन जमिनीवरील अडचणी दुर करून मालामाल होणे फक्त आणि फक्त या साठी जनविकास आघाडी ला केज नगरपंचायत ची सत्ता पाहिजे असल्याच बोलल जात.दलित नगराध्यक्ष हा फक्त कागदी शिक्का असतो.कारण स्वतःच्या वार्डातील आलेला आण्णाभाऊ साठे मागासवर्गीय योजनेंतर्गत आलेला निधी सुद्धा ते आपल्या वार्डात जेथे दलित लोक राहतात तिथे टाकू शकले नाहीतर.जिथे सर्वेसर्वा त्यांचे नगरसेवक व नातेवाईकांची इनामी जमीन आहे व जिथे प्लांटीग प्रस्तावित असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी जेथे प्लांटीग प्रस्तावित आहे अस्या ठिकाणी रस्ता घेऊन गेला.ज्या वार्डाचे प्रतिनिधित्व नगराध्यक्ष करतात दलित असल्याच सांगतात त्याना सुद्धा लोकवस्तीत रस्ता करता आला नाही ही एक खूप मोठी शोकांतिका असल्याच राखीव वार्डातील जनतेच म्हणणे आहे.अश्या कठपुतली नगराध्यक्षाला निवडून का दिले असा प्रश्न आता ते एकमेकांत विचारत आहेत.
असीच तुकडा संस्कृती कार्यकर्त्या बाबतीत आहे.जो कोणी नगरपंचायत विरोधात बोलेले किंवा लिहील त्याला ट्रोल करणे शिवीगाळ करणे. ऐवढेच काम दिलेले असते रोखठोक अशी माहिती भेटली आहे की अश्या कार्यकरत्याचा दारू, मटन,बाजार हा सगळा खर्च पुरवला झातो प्रत्येक कार्यकर्त्या कडे एक डायरी असते ती बाजाराच्या दिवशी घेऊन जायची व त्यात रक्कम नोंदवून पैसे घेऊन यांयच.हे सत्तेच्या माध्यमातून प्लांटीग, रस्त्याच्या टक्केवारीत करोडो कमवायचे व याना तुकडा देयचा ह्याच तुकडा संस्कृतीने युवक व्यसना कडे वळतात व बरबाद होत आहेत. असे जनतेत चर्चीले जात आहे.
