• Sat. Apr 25th, 2026

केज येथून अल्पवयीन मुलीस पळवले

Bybaba maske

Feb 17, 2024

केज येथून अल्पवयीन मुलीस पळवले

रोखठोक न्युज वार्ताहर

केज शहरातील फुले नगर येथे राहणाऱ्या एका १५ वर्षाच्या – अल्पवयीन मुलीस आरोपीने फुस लावून पळवून नेल्याची घटना घडली असुन पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केज शहरातील फुले नगर मध्ये फिर्यादी या आपल्या कुटुंबासह राहतात फिर्यादी यांना एक पंधरा वर्षाची मुलगी आहे. या पंधरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शेजारीच फुलेनगर मध्ये राहणाऱ्या सोहेल मंजूर पठाण याने अज्ञात कारणावरून मुलीच्या राहत्या घरुन फुस लावून पळून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मुलगी घरात नसल्याचे मुलीच्या आईच्या लक्षात येतात मुलीच्या आईने केज पोलीस ठाणे गाठत सोहेल मंजूर पठाण राहणार फुलेनगर यांने मुलीला फूस लावून पळून नेल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोउपनि पाटील हे करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!