.सत्ता सत्तेतून जमीन मग प्लॉटींग या साठी हवा नगरपंचायत चा सारीपाट
“जमीन बकासुराच्या” ताब्यात नगरपंचायत.
वरदहस्त साठी लवकरच राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत च्या सारीपाटावर सद्या भुमाफीया,भु”बकासुराच” राज्य आहे.केज शहरातील नगरपंचायत ताब्यात का व कशी घ्याची याचे एक गणित जनविकास आघाडीच्या सर्वेसर्वा यांनी साधल आहे.केज येथे प्रसिद्ध दर्गा आहे त्या दर्ग्याची सेवा करा व तुम्ही यातुन आपला उदरनिर्वाह करा म्हणून हजारो एकर जमीन हि मुस्लिम बांधवात वाटप केली.त्या नुसार दर्ग्याची सेवा व स्वतःचा उदरनिर्वाह बरोबर चालत होता पण शहर वाढत गेल तसे काही जण जमीन विकायला लागले.या जमीनीची सरकारी रजिस्ट्री होत नसताना नोटरीच्या माध्यमातून जमीन विक्री होऊ लागली.काही दिवसात हजारोत विकणारी जमीन करोडो रूपयात विकण्यास सुरुवात झाली आणि ईथेच डोळे पांढरे होण्यास सुरुवात झाली.मग ही जमीन माझी का तुझी, माझ्या आजोबांची, पंजोबाची असे भाडणे आपापसात होऊ लागले.त्यातच सर्वेसर्वाचा राजकीय उदय झाला व त्या समाजाचा मसीहा म्हणून थोडक्यात पुढे आला.पण दुसर्याचे जमीनीचे भांडण मिटवतात मिटवता स्वतःच तंट्यातील जमीन स्वतः खरेदी करू लागला.मग त्या साठी त्या काळातील ग्रामपंचायत लढवली पण पुर्ण बहुमत आले नाही आघाडीच्या सत्तेत उपसरपंच व्हा असे सांगीतले कारण सरपंच पद राखीव होते पण त्यांनी आपल्या गटाचा सरपंच करून उपसरपंच पद दुसर्या गटाला दिले व ग्रामपंचायत ताब्यात घेतली.मग चालु झाला खरा जमीनीचा व सत्तेचा खेळ.कुठला सातबारा कुठे तर कुठला घरनंबर कुठे सगळ धाब्यावर बसवून नोंदीची आदलाबदल करून ग्रामपंचायत मध्ये फेर घेतले जाऊ लागले.अश्यातच नगरपंचायत झाली ती सुद्धा ताब्यात आली.शहरातील नऊ,दहा वार्ड असे आहेत की ज्यात मुस्लिम व मागासवर्गीय समाज जास्त रहातो अश्या भागातील रहिवाशांना आर्थिक मदत करणे.तिथल्या युवकांना मटण दारू साठी पैसे देणे.यातच ते स्वतःला मसिहा समजू लागले यांच्या विरोधात हे युवक शब्द ऐकण्यास तयार होईनात.यांचे भांडणे झाली कि पोलीस स्टेशन जा भांडणे सोडवणे यांच्या न्यायालयात जामीन घे यात ते हिरो झाले.पण ऐवढ्या काळात ईकडे बीड-अंबाजोगाई रोडवरची करोडो रूपयांची गायरान जमीन बळकावून विकली होती.काही गरीब दलित कुटुंब या गायरान जमीनीत बसले होते त्याचे नाव “अचानक नगर” ते अचानक नगर या महाशयाने एका रात्रीत बुलडोझर च्या साह्याने नेस्तनाबूत केले.पण झिंग चढलेल्या युवकांना आपल्याच गरीब दलितावर अन्याय होतोय हे लक्षात येत नव्हते कारण दारू,मटण,व आठवडी बाजाराला काही रक्कम मिळत होती.दलिताला फसवल्या नंतर त्यानी आपल्याच भाऊबंदकीला,जातभाई ला सुद्धा फसवल कधी दादागिरी करून तर कधी खोटी कागदपत्र तयार करून तर कधी आदलाबदलीच्या नावाने मोक्याच्या जागा स्वतः बळकावल्या आहेत.सद्या दलितांन साठी असलेली 13/1 व 13/2 गायरान जमीन जनविकास इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या नावे म्हणजे आपलीच खोटी कंपनी दाखवून हडप केली व त्याचे प्लाॅट पाडून विकले आज त्याची न्यायालयात खटला चालु आहे यात जज पासुन राजकीय नेते,प्रतिष्ठित नागरीकाशी करोडाचा व्यवहार करून बसले आहेत.आज हे खरेदीदार परेशान आहेत पैसा ही गेलाय आणि जमीन न्यायालयीन वादात अडकली आहे.तीच गत जामा मशीद ची17/1 व 17/2 या खिदमश माश नावाची बीड-अंबाजोगाई रस्त्या लगत ची जागा आपल्या नावाने करून विकली आहे.खरी तर ही जागा नगरपंचायत च्या डीपी प्लॅन नुसार न्यायाालयी कर्मचारीवर्गाच्या निवासस्थाना साठी राखीव असताना आपल्या पदाचा नगराध्यक्ष व सर्वेसर्वाने गैरवापर केला आहे. सातबारावरची नोंद न करता दुसर्याचा घरनंबर दाखवून नोंद केल्या पण असे होऊ शकले नाही.तरी पण जनविकास आघाडीच्या सर्वेसर्वाने जमीन आहे म्हणून विना बांधकाम परवानगी टोलेजंग इमारत येथे बांधल्या जात आहेत कारण यांना माहीत आहे.नगरपंचायत माझ्या ताब्यात असे पंर्यत मी काहीही करू शकतो.अश्या बोगस कामा मुळे येथे कुठलाच प्रशासकीय अधिकारी टिकत नाही किंवा नवीन येत नाही कारण सगळ्यांना आपल्या नौकरीची भीती.आता सद्या राजकीय वरदहस्त नसल्या मुळे ते लवकर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)या मध्ये सामील होऊन पालक मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद घेण्याची चर्चा आहे.कारण ते स्वता वार्ड क्रमांक सहा मधून पडल्या नंतर स्वीकृत सदस्य झाले आहेत तर नगराध्यक्ष ने नगराध्यक्ष झाल्यावर विना बांधकाम परवाना घेता घर बांधले व तक्रार मा.नगरसेवक कपिल मस्के यांनी दाखल करताच दुसर्याच्या नावे केले.त्यामुळे दोघाचे ही पद जाणार हे निश्चित आहे म्हणून यांना आता सत्ताधारी गटात किंवा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच हाथ डोक्यावर पाहिजे.पण यांचा स्वभाव आहे ज्याचा हाथ डोक्यावर घेतात तेच हाथ पुन्हा काही दिवसात पायाखाली तुडवला जातो.आज केज नगरपंचायत मध्ये काँग्रेस ची काय अवस्था करून ठेवली आहे ही केजची जनता पहात आहे.निधी साठी मुंदडा-आडसकर दरवाज्याची साल न ठेवणारे आज बिनधास्त धनंजय मुंडे गटात जात आहेत.
