• Sat. Apr 25th, 2026

रमेशराव आडसकर बजरंग बप्पा काय तुमच्या मनात सांगा आमच्या कानात.

Bybaba maske

Feb 20, 2024

रमेशराव आडसकर बजरंग बप्पा काय तुमच्या मनात सांगा आमच्या कानात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी कॉग्रेस चे बीड जिल्हा लोकसभा लढवलेले तथा जिल्हापरिषद उपाध्यक्ष राहिलेले बजरंग सोनवने व रमेशराव आडसकर यांच्या मनात सध्या काय चाललंय हे कुणाच्या लक्षात येत नाही.सद्या परिस्थिती दोन साखर कारखाने असलेले बजरंग सोनवने हे प्रस्थ नेमके काय करतय?तर अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन असलेले व कित्येक शैक्षणिक क्षेत्रात दबदबा असलेले रमेश आडसकर गेल्या पंचवीस वर्षा पासुन केज मतदारसंघ राखीव असल्या मुळे येथे खुल्या प्रवर्गातील नेत्याची राजकीय कोंडी झाली आहे.एकतर त्यांना जिल्हापरिषद सदस्यावर तहान भागवावी लागते किंवा मग रमेशराव आडसकर यांचा सारखा बाजूला मंतदारसंघ शोधावा लागतो.दोघानी ही या आगोदर लोकसभा निवडणूक लढवली आहे.रमेशराव आडसकर यांनी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात तर बजरंग सोनवणे यांनी त्यांची मुलगी विद्यामान खासदार प्रितमताई मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवली.पण दोघेही पराभूत झाले.दोघाचीही तहान जिल्हापरिषद वर भागवावी लागली.पण सद्य परिस्थितीत दोघांचेही राजकीय महत्त्वाकांक्षा ला कुठे तरी ब्रेक लागल्याच दिसून येत आहे भाजप मध्ये असलेले रमेशराव व राष्ट्रवादीत असलेले बजरंग सोनवणे या दोघांची राजकीय कोंडी झाली आहे.रमेशराव आडसकर यांनी आपला शेजारील माजलगाव मंतदारसंघ निवडून तेथे भाजप तर्फे विधानसभा लढवली व पराभूत झाले तर बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे लढून पराभूत झाले.आता भाजप व राष्ट्रवादी सोबत आली आहे.त्यामुळे माजलगाव मंतदारसंघ हा राष्ट्रवादी साठी प्रभळ मंतदारसंघ मानला जात असून ती जागा विद्यामान आमदार प्रकाश सोंळके सोडणार नाहीत तर लोकसभा विद्यामान खासदार प्रितमताई भाजपच्या असल्याने तो राष्ट्रवादी कॉग्रेस साठी भाजप सोडणार नाही त्यामुळेच या दोघा राजकीय धुरंधराची कोंडी झाली आहे त्यामुळे येत्या निवडणुकी अगोदर हे कोणती राजकीय निर्णय घेतात या कडे सर्व बीड जिल्ह्य़ातील जनतेच लक्ष लागले आहे.सद्या तरी बंजरग सोनवणे यांनी आपले राजकीय डाव माडण्यास सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.त्यांच्या मनाविरुद्ध धनंजय मुंडे गटाची एक लाॅबी काम करत आहे.त्यामुळे ते आगोदर दुखावले आहेत.त्यात त्यांना डिपीडिसीचा हिस्सा वरून नाराजी आहे.त्यामुळे येत्या लोकसभेत त्यांचा निर्णय वेगळा असु शकतो? पण रमेशराव आडसकर यांनी अजून आपले पत्ते उघड केले नाहीत.ते पहिल्या पासून MLC विधानपरिषदे वर जाण्याच्या अपेक्षे वर आहेत.पण सध्या जिल्ह्यातील व भाजप पक्षातील पंकजाताई मुंडे यांची परिस्थिती बघता ते अवघड वाटते त्यामुळेच रमेशराव आडसकर काय भुमिका घेतात हे सुद्दा महत्वाचे व राजकीय कलाटणी देणारे ठरणार आहे. लोकसभा लागे पर्यंत कोण कोणते भुंकप बीड जिल्ह्य़ात होता ते बघने अवचित्याचे ठरेल.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!