• Sun. Apr 19th, 2026

नगरपंचायतने दलित निधी वळवला इतरत्र.ते पण समाजकल्याणच्या परवानगीशिवाय,जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून. मुख्यधिकारी गैरहजर अधीक्षकाच्या हजेरीत घेतली मिंटीग. कोरम नसताना घाईघाईत स्थायी समितीत मंजूर केला निधी

Bybaba maske

Mar 4, 2024

नगरपंचायतने निधी वळवला इतरत्र.ते पण समाजकल्याणच्या परवानगीशिवाय,

जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून.

मुख्यधिकारी गैरहजर अधीक्षकाच्या हजेरीत घेतली मिंटीग.

कोरम नसताना घाईघाईत स्थायी समितीत मंजूर केला निधी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

सविस्तर वृत्त असे की केज शहरातील दलित वस्तीत रस्ते नाली करण्या साठी आण्णाभाऊ साठे मागासवर्गीय योजनेंतर्गत समाजकल्याण अंतर्गत निधी मंजूर झाला होता.पण केज नगरपंचायत ला दलित नगराध्यक्ष असताना तो निधी जनरल वार्डात वितरित केला त्या साठी दिनांक 1 मार्च 2024 ला स्थायी समितीची मिंटीग घेतली.

केज नगरपंचायत ला मुख्याधिकारी उत्कृष गुटे हे अधिकारी असताना त्याच्या गैरहजरीत नगरपंचायत च्या अधिक्षकाच्या उपस्थित मिंटीग घेतली पण नियमा नुसार नगरपंचायत चे जेवढे निर्वाचित सभापती असतात ते मिंटीग ला हजर असावे लागतात पण तसे न होता काँग्रेस पक्षाचे नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शितलताई दांगट, बांधकाम सभापती  सोमनाथ गुंड व एक अपक्ष असे तिघे जन गैरहजर असताना मिंटीग घेतली व दलित वस्तीतील आल्याला निधी हा इतर वार्डात खर्च करण्या साठी परवानगी दिली.

यात तीन सभापती गैरहजर असताना विषेश म्हणजे बांधकाम सभापती गैरहजर होते.तर सभापती पल्लवी रांजनकर या सुद्दा बाहेर गावी होत्या तर पुर्ण नसताना कामास मंजूरी कशी भेटली त्यात ही सूत्रानुसार माहिती आहे की ही परवानगी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करून आणली कारण या साठी लागणारे समाजकल्याण चे प्रमाणपत्र घेतलेच नव्हते ते नंतर घतले व जोडण्यात आले.या वेळेस नगरपंचायत चे प्रशासकिय असलेले पदसिद्ध मुख्याधिकारी डोळे झाकून कसे बसले? का याला मुख्याधिकारी यांची सहमती होती ?या सगळ्या गोष्टीचा उहापोह होणे गरजेच आहे.दलित निधी जर दलित वस्तीत दलित नगराध्यक्ष इतरत्र वळवत असतील तर यात दलित समाजावर अन्याय होत असल्याची भावना आहे.यात प्रशासकिय अधिकारी म्हणून उत्कृष गुटे हे संपूर्ण दोषी आहेत व त्यांच्यावर कारवाई करावी अशी दलित बांधवा मध्ये चर्चा आहे.

या दरम्यान दिनांक 1 मार्च ला झालेल्या स्थायी समिती च्या बैठकीचे सीसीटिव्ही फुटेज केज नगरपंचायत चे मा.नगरसेवक कपिल मस्के यांनी अर्ज देऊन मागणी केली आहे.त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले हे खरे असून मिंटीग ला तीन सभापती गैरहजर होते त्यामुळे कोरम पुर्ण होत नाही,त्या साठीच सीसीटिव्ही फुटेज मागवले आहे पण प्रथे प्रमाणे नगरपंचायत ते उपलब्ध करून देणार नाही काहीतरी कारण सांगून हे फुटेज दडपण्यात येईल. तसेच सभापती पल्लवी रांजणकर या बाहेर गावी असताना त्यांची प्रोसेसिग वर हस्ताक्षर कोणी केले? तसेच कोरम नसल्याने या मिंटीग मध्ये झालेले सगळे मंजूर प्रस्ताव रद्द करावेत व दलित वस्तीत आलेला निधी जर खरच दलित नगराध्यक्ष असतील तर त्यांनी दलित वस्तीत खर्च करावा.अशी सुचक प्रतिक्रिया कपिल मस्के यांनी दिली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!