• Sun. Apr 19th, 2026

रोखठोक न्युज बातमीचा इम्पॅक्ट.  जिवाचीवाडी येथील तलावातून दोन मोटारी जप्त. तहसीलदार अभिजीत जगताप यांची कारवाई.

Bybaba maske

Mar 3, 2024

रोखठोक न्युज बातमीचा इम्पॅक्ट. 

जिवाचीवाडी येथील तलावातून दोन मोटारी जप्त.

तहसीलदार अभिजीत जगताप यांची कारवाई.

रोखठोक न्युज वार्ताहर 

पाणी पिण्यासाठी आरक्षित असताना केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील साठवण तलावावरून अवैध पाणी उपसा सुरू असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत तहसीलदारांनी शनिवारी दुपारी अचानक तलावास भेट देत दोन विद्युत मोटारी जप्त केल्या असून या विद्युत मोटारीचे पाइप फोडण्यात आले आहेत.

यंदा अल्प पावसामुळे केज तालुक्यातील मांजरा धरणासह मध्यम, लघु प्रकल्प आणि साठवण तलावात अपेक्षित पाणीसाठा झाला नव्हता. त्यामुळे उन्हाळ्याच्या

दिवसांत पाण्याची टंचाई भासू नये म्हणून उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदार अभिजित जगताप शाप य यांनी संबंधित यंत्रणेस अवैध पाणी उपशावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र लघुसिंचन शाखा, तलाठी, मंडळ अधिकारी, विद्युत महावितरणचे लाइनमन यांच्या यंत्रणेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने जिवाचीवाडी येथील साठवण तलावातून रात्रीच्या वेळी चोरून सिंचन उपसा होत असल्याचे वृत्त दिव्य मराठीने २७ फेब्रुवारी रोजी प्रकाशित केले होते. वृत्ताची दखल घेत शनिवारी

दोन दिवसांचा अल्टिमेटम

जिवाचीवाडी तलावातून तहसीलदार जगताप यांनी मोटारी जप्त केल्या.

दुपारी २ वाजेच्या सुमारास तहसीलदार अभिजित जगताप यांनी अचानक भेट दिली. तहसीलदारांनी तलावात टाकलेल्या दोन विद्युत

मोटारी जप्त केल्या, तर या विद्युत मोटारीला जोडलेले पाइप फोडून टाकण्यात आले. उर्वरित विद्युत मोटारी काढून घेण्याच्या सूचना

जिवाचीवाडी साठवण तलावावरील दोन विद्युत मोटारी जप्त करून आणल्या आहेत. विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने आता पाणी उपसा करता येणार नसून उर्वरित विद्युत मोटारी, पाइप हे साहित्य काढून घेण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. दोन दिवसांनी भेट देऊन निदर्शनास येणाऱ्या मोटारी व साहित्य जप्तीची कारवाई केली जाणार आहे. अभिजित जगताप केज तहसीलदार, केज ,

संबंधित यंत्रणेसह शेतकऱ्यांना दिल्या आहेत. तर तलाव परिसरात असलेला विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. विड्याचे मंडळ अधिकारी सुहास डोरले, जिवाचीवाडीचे तलाठी उत्रेश्वर घुले, ग्रामसेवक महेंद्र मुंडे, जलसिंच शाखा कार्यालयाचे श्रीनिवास हंगे, महावितरण कंपनीचे लाइनमन शिवाजी घुले, सरपंचाचे पती दिपक काळे हे उपस्थित होते. दरम्यान, तहसीलदार अभिजित जगताप यांनी अचानक भेट देत दोन विद्युत मोटारी जप्त करीत केलेल्या घडक कारवाईमुळे अवैध पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!