• Tue. Aug 25th, 2026

आई, मला तरुणांनी मारलं, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या

Bybaba maske

Mar 3, 2024

आई, मला तरुणांनी मारलं, अशी चिठ्ठी लिहून आत्महत्या

रोखठोक न्युज वार्ताहर 

दोन महिन्यांपूर्वी गावातील तरुणांनी केलेल्या मारहाणीत उजवा हात मोडला. त्यामुळे तणावात असलेल्या तरुणाने ‘आई… मला तरुणांनी मारलं’ अशी चिठ्ठी लिहून गळफास घेतला. ही घटना केज तालुक्यातील इस्थळ येथे शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला केज तालुक्यातील इस्थळ बाळासाहेब आपटे (वय २७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती. ‘आई… मला गावातील मारलं, म्हणून मी आत्महत्या करतोय. याला

जबाबदार वैभव शिंदे, राम शिंदे व खंडू बाबा आहेत. पोलिसांनी आपल्यासोबत न्याय केला नाही.’ असा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहून ठेवला आहे. चैतन्य अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव प्राथमिक आरोग्य डेटा ऑपरेटर म्हणून कामाला होता. त्याचे दोन महिन्यांपूर्वी गावातील तरुणांसोबत भांडण झाले होते. यात त्याचा उजवा हात मोडला होता. त्यामुळे चैतन्य तणावात होता.

शुक्रवारी दुपारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. युसुफवडगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलवला. त्यांच्यावर सायंकाळी साडेसहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. चैतन्यच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!