• Sat. Apr 25th, 2026

फौजदारच निघाला ड्रग्ज तस्कर; 45 कोटींच्या ड्रग्ससह अटक

Bybaba maske

Mar 2, 2024

फौजदारच निघाला ड्रग्ज तस्कर; 45 कोटींच्या ड्रग्ससह अटक

रोखठोक न्युज वार्ताहर 

पिंपरी चिंचवडच्या पिंपळे निलख परिसरात 2 कोटींचे मेफेड्रोन (एमडी) ड्रग्स विक्रीच्या प्रयत्नातील युवकाला काल (1 मार्च) अटक केली होती. पोलिसांना या प्रकरणात आरोपीच्या संपर्कातील पोलीस फौजदाराचा थेट सहभाग असल्याचा संशय होता. अखेर निगडी पोलीस ठाण्यात नियुक्तीस असणाऱ्या फौजदार विकास शेळके याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, फौजदार शेळके याच्याकडून ४५ कोटी रुपये किमतीचे ४४.५० किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

आरोपीला पहाटे ड्रग्जसह अटक : याप्रकरणी नमामी शंकर झा (३२, रा. निगडी. मूळ रा. बिहार) याला सुरुवातीला अटक करण्यात आली होती. पोलीस अंमलदार विजय मोरे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (१ मार्च) पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे सांगवी पोलिसांकडून सुरुवातीला कारवाई करण्यात आली होती. तेव्हा नमामी शंकर झा याला अटक करून त्याच्याकडून २ कोटी रुपये किमतीचे २ किलो ३८ ग्रॅम वजनाचे एमडी जप्त करण्यात आले होते. आरोपीकडे जे ड्रग्स आढळून आले, त्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस दलातील निगडी पोलीस ठाण्याचा अधिकारी विकास शेळके याचाही सहभाग असल्याचं उघड झालं आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!