• Sat. Apr 25th, 2026

अंध दलित व्यक्तीला फसवणूक करणाऱ्या दिलीप चाटे वर फसवणुक, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. गृहनिर्माण संस्थेची जागा दोघांना विकली होती.सलग 9 दिवस तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते.

Bybaba maske

Mar 2, 2024

अंध दलित व्यक्तीला फसवणूक करणाऱ्या दिलीप चाटे वर फसवणुक, ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल.

गृहनिर्माण संस्थेची जागा दोघांना विकली होती.

सलग 9 दिवस तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज – तांबवा ( ता. केज ) येथील गृहनिर्माण संस्थेच्या चेअरमनने संस्थेच्या नावे असलेल्या एकाच प्लॉटची दोघांना नोटरी करून देत फसवणूक केल्याप्रकरणी चेअरमनविरुद्ध फसवणुकीसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकाराने दुय्यम निबंधक कार्यालयामार्फत खरेदी खत न करता वरचेवर जागा व प्लॉटची नोटरी करून देणाऱ्या लोकांमध्ये खळबळ उडाली आहे.

केज तालुक्यातील तांबवा येथे श्री भगवान बाबा गृहनिर्माण संस्थेच्या नावाने तांबवा येथे गट नं/सर्व्हे नं १२७ मध्ये १.९२ हे आर जमीन आहे. या गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन दिलीप हरिभाऊ चाटे यांनी या भूखंडापैकी ३०×४० फूट आकाराचा प्लॉट हा तांबवा येथील अंध शाहीर विष्णू ओव्हाळ यांचा मुलगा आनंद ओव्हाळ यास ९ डिसेंबर २०२३ रोजी ५० हजार रुपयांमध्ये विक्री केला. मात्र सदर प्लॉटच्या खरेदी – विक्रीचा व्यवहार हा दुय्यम निबंधक कार्यालयातून न करता शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी करून केला. त्या जागेवर आनंद ओव्हाळ यांचे अंध वडील आणि आई व कुटुंब हे पत्र्याचे शेड करून वास्तव्यास होते. एक महिन्यापूर्वी २३ जानेवारी २०२४ रोजी ओव्हाळ यांच्या घरासमोर राहत असलेले गोरख लांब, चिंगुबाई उर्फ मिरा चाटे, सिंधूबाई चाटे या तिघांनी ओव्हाळ यांच्याकडे जाऊन त्यांना हा प्लॉट त्यांच्या मालकीचा असून त्यांच्या व्यवहाराच्या चार महिन्यापूर्वी त्यांनी हा प्लॉट दिलीप चाटे यांच्याकडून विकत घेतला आहे. हा व्यवहार ही नोटरी करण्यात आलेला आहे. असे म्हणून त्यांनी त्यांच्याकडे असेलेला स्टॅम्प पेपर दाखविला. त्यानतंर आनंद ओव्हाळ यांना चेअरमन दिलीप चाटे यांनी प्लॉटच्या व्यवहारात फसवणूक केली आहे. असे लक्षात आल्यावर १२ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आनंद ओव्हाळ यांचे अंध वडील विष्णू ओव्हाळ हे दिलीप चाटे यांचे शेतात गेले. त्यांनी दिलीप चाटे यांच्याकडे त्यांनी एकाच जागेची दोघांना दोन वेळा नोटरी का करून दिली याचा जाब विचारला असता दिलीप चाटे यांनी आनंद ओव्हाळ व त्याचे अंध वडील विष्णू ओव्हाळ यास जातीवाचक शिवीगाळ करून तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणून हाकलून दिले. त्यानंतर सदरील फिर्यादी पोलीस ठाण्यात तक्रार नोदवण्यास गेले असता तक्रार नोंदविण्यात आली  नाही त्यामुळे त्यानी केज तहसील कार्यालयासमोर सलग 9 दिवस उपोषण केले त्या नंतर  १ मार्च रोजी आनंद ओव्हाळ यांनी दिल्यावरून दिलीप चाटेविरुद्ध केज पोलिसात फसवणुकीचा व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस अधीक्षक कमलेश मीना हे तपास करीत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!