• Thu. Sep 17th, 2026

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा गंभीर आरोप

Bybaba maske

Mar 4, 2024

गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; असीम सरोदेंचा गंभीर आरोप

रोखठोक न्युज वार्ताहर 

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदारांच्या गुवाहाटीतील दौऱ्याबाबत ऍड असीम सरोदे यांनी मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत.

धाराशिव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवेळी अनेक सेनेचे आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले होते. दरम्यान, त्यांच्या याच गुवाहाटीतील दौऱ्याबाबत ऍड असीम सरोदे यांनी मोठे आणि गंभीर आरोप केले आहेत. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना सरोदे यांनी हे वक्तव्य केले आहेत. 

निर्भय बनो या कार्यक्रमात बोलतांना ऍड असीम सरोदे म्हणाले की, “गुवाहाटी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार घेऊन गेल्यावर 2 आमदाराना मारहाण करण्यात आली होती. तसेच, स्पाईस जेट व इंडिगो या विमान कंपनीच्या महिला एअर होस्टेस यांचा शिंदे सेनेतील आमदारांनी विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला होता. गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये इतर लोकांना प्रवेश नव्हता, दारूच्या नशेत झिंग होऊन हे सगळे तिथे गेले होते असेही सरोदे म्हणाले आहेत. 

नेमकं काय म्हणाले असीम सरोदे?

“शिवसेना फोडत असतांना भाजपच्या माध्यमातून जो घोडेबाजार झाला आहे, ज्यात एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन पळून गेले. ते गुवाहाटीला गेले. मी आपल्याला एक अत्यंत महत्वाची माहिती म्हणून सांगत आहे.जी माहिती आतापर्यंत कधीही पुढे आलेली नाही. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला, मात्र आठ किलोमीटरवरून त्यांना परत पकडून आणण्यात आले. त्यानंतर त्या गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली. त्या दोन्ही आमदारांना कोणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. गुवाहाटीच्या ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये इतर कोणत्याही ग्राहकांना परवानगी नव्हती. परंतु, स्पाईस जेट व इंडिगो या कंपनीकडून आधीपासूनच या हॉटेलमध्ये काही रूम बुक करण्यात आलेल्या होत्या. त्यांचा तो वार्षिक करार होता. त्यामुळे हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहत होत्या. माझा प्रश्न आहे, त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर होस्टेसच्या छातीवर हात कोणी नेला. एअर होस्टचा विनयभंग व लैंगिक अत्याचाराचा करण्याचा प्रयत्न कोणी केला हे महाराष्ट्राने शोधले पाहिजे. याचं खरं चरित्र आपल्या समोर येईल. दारूच्या नशेत झिंगत असलेले हे नेते आज जरी मोठ्या-मोठ्या मंत्री पदावर बसले असले, तरीही या पैश्याचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही,” असे सरोदे म्हणाले.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!