• Thu. Sep 17th, 2026

शहरातून तिसरा डोळा गायब!! पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष.

Bybaba maske

Mar 5, 2024

शहरातून तिसरा डोळा गायब!!

पोलीस प्रशासनाच दुर्लक्ष.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज शहर हे 144 गाव असलेला बीड जिल्ह्य़ातील मोठे तहसील असलेले शहर आहे या शहरात रोज मोठ्या प्रमाणावर नागरिक,व्यापारी खरेदी विक्री करण्यासाठी शहरात येत असतात,शहरात दोन आठवडी बाजार मंगळवार व शुक्रवार असे असतात त्यामुळे.शहरात रोज हजारो नागरिकांची वरदळ असते पण त्यांच्या सुरक्षिततेबाबत कुठलीही सुविधा शहरात उभी केलेली दिसुन येत नाही.गुन्हेगारी रोखण्यात साठी व तपासात एक उत्तम पर्याय म्हणून सीसीटिव्ही कडे बघीतले जाते पण केज पोलीस प्रशासनाने कोठेच सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचे दिसुन येत आहे.त्या मुळे हिट अँड रन,मोटारसायकल चोरी, मग॔ळसुत्र चोरी,पाकीटमार,मोबाईल चोरी,भररसत्यात मारामारी,अस्ताव्यस्त पार्किंग अश्या मोठ्या समस्या शहरात उभ्या राहिल्या आहेत.याला पोलीस प्रशासन गांभीर्यपूर्वक पहाणे गरजेच असताना तसे होत नाही.लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत आता काही दिवसात प्रचार चालु होईल मोठ्या रॅली,सभा होतील त्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही गरजेच आहे.जिल्ह्य़ातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ही यंत्रणा कार्यान्वित असताना किंवा तेथील पोलीस प्रशासन लोकसहभागातून,व्यावसायिकाच्या मदतीतून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्याच पर्यंत करतय पण केज पोलीस स्टेशन गप्पगार बसून आहे त्याच इंगित काही कळेना.शहरात अवैध धंद्याचा ऐवढा सुळसुळाट असताना पोलीस ऐवढे शात कसे बीड जिल्ह्य़ात क्राईम रेट मध्ये केज तालुका दोन नंबर वर आहे.असे असताना पोलीस यंत्रणा कुठलीच काळजी घेत नसल्याच दिसून येत आहे.तालुक्यातील जनतेची सुरक्षा रामभरोसे आहे का काय? असे आता भितीने नागरिकात बोलले जात आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!