• Thu. Sep 17th, 2026

अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन दोघांनी केला अत्याचार

Bybaba maske

Mar 13, 2024

अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन दोघांनी केला अत्याचार

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील घटना, २ अनोळखींवर गुन्हा एका अल्पवयीन मुलीस निर्जनस्थळी नेऊन दोन अनोळखींनी अत्याचार केला. ही घटना केज तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. याप्रकरणी दोघांवर केज पोलिस ठाण्यात अत्याचार व पोस्कोचा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील १४ वर्षांची मुलगी परजिल्ह्यात शिक्षण घेत असून ती आपल्या गावी आली होती. अनोळखी दोघांनी तिला

निर्जनस्थळी नेत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराने घाबरून गेलेल्या पीडित मुलीने आई – वडिलांना ही माहिती सांगताच पीडित मुलीच्या वडिलांनी ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्यासमोर पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अज्ञात दोघांविरुद्ध अत्याचार व पोस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंक पथकाचे फौजदार प्रकाश शेळके पुढील तपास करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!