• Thu. Nov 26th, 2026

गोडाऊन मधील 2 लाखाचे सोयाबीन चोरणारे ताब्यात.

Bybaba maske

Mar 13, 2024

गोडाऊन मधील 2 लाखाचे सोयाबीन चोरणारे ताब्यात.

रोखठोक न्युज वार्ताहर 

गोडाऊनमधून सोयाबीनचे कट्टे चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

बनसारोळा येथील क्रांतीज्योती अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे पत्राचे गोडावूनचे पाठीमागील खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश करून गोडावून मधील सोयाबिनचे एकुण ११४ सुतळी कट्टे वजन अंदाजे ७० क्विंटल चार हजार प्रमाणे एकुण २ लाख ८० हजारांचा माल अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला होता. याप्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपस करत असतांना पोलिसांना माहिती मिळाली कि, इसम नामे संतोष प्रभाकर कुन्हाडे रा. आंकलखोप सुभाषनगर जि.सांगली याने त्याचे आयशर टॅम्पोमध्ये ढोकी ता. जि. धाराशिव येथील त्याचे साथीदारासह मौजे बनसारोळा ता. केज जि.बीड येथील सोयाबीन चोरी केलेली आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळताच तपास केला असता त्याने व त्याच्या साथीनेच हे कट्टे चोरल्याचे सामोरे आले.

याप्रकरणी दादा उध्दव चव्हाण, महादेव सुरेश चव्हाण या दोघांना ताब्यात घेऊन चोरी गेलेले २ लाख ८० हजाराचे ११४ कड्‌यांपैकी १ लाख ६५ हजारांच्या किमतीचे ६९ कट्टे परत मिळून दिले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, पोउपनि सुशांत सुतळे, रामदास तांदळे, मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, राजु पठाण, अर्जुन यादव, अश्विनकुमार सुरवसे, अतुल हराळे यांनी केली आहे.

baba maske

Related Post

बीड–अंबाजोगाई महामार्गावरील लॉजमध्ये कथित वेश्याव्यवसायाचा सुळसुळाट! लॉज चालकांना कोणाचे अभय? चोवीस तास डोळ्यात तेल घालून काम करणाऱ्या पोलिसांना हे दिसत नाही का?
रमाई नगरच्या गायरान जमिनीवर भूमाफियांचा डोळा! वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या दलित कुटुंबांना हुसकावण्याचा प्रयत्न? बेकायदेशीर खरेदी-विक्री थांबवण्याची मागणी आठ दिवसांत कारवाई करा, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा-योगेशभाई गायकवाड
केज शहराला लॉजचा विळखा! परवान्यांचा हिशेब कुठे? अवैध धंद्यांच्या संशयाने नागरिक संतप्त! अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न; लॉजची दिवसा-रात्री अचानक झडती घेण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!