• Fri. Sep 18th, 2026

भाजप नेत्यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न फसला. दोन विना नंबरच्या गाड्यातुन आलेल्या दरोडेखोरांच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे असल्याचा संशय !

Bybaba maske

Mar 24, 2024

भाजप नेत्यांच्या घरावर दरोड्याचा प्रयत्न फसला.

दोन विना नंबरच्या गाड्यातुन आलेल्या दरोडेखोरांच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे असल्याचा संशय !

रोखठोक न्युज वार्ताहर 

गौतम बचुटे/केज :- भाजपचे नेते आणि काळेगाव घाट येथील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राहुल गदळे यांच्या दहिफळ वडमाऊली येथील घरावर अज्ञात सात ते आठ लोकांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्या घरा असलेल्या शेजाऱ्यांमुळे त्यांचा प्रयत्न फसला.

 या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील भाजपचे नेते आणि काळेगाव घाट येथील महाविद्यालयाचे प्राचार्य राहुल भैय्या गदळे यांचे वडील सखाहरी गदळे तात्या हे दहिफळ वडमाऊली येथील राहत असल्या घरी दि. २३ मार्च रोजी मध्यरात्री घरा समोर विना नंबरच्या दोन पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कार मधून सात ते आठ अनोळखी दरोडेखोर आले. त्यातील एकाने त्यांच्या घरा समोर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा फोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यावेळी त्यांच्या घराशेजारी असलेल्या शेजाऱ्यांना चाहूल लागल्याने दरोडेखोर घरात प्रवेश न करता पळून गेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

 दरम्यान त्या चोरट्या पैकी दोघांच्या अंगावर खाकी रंगाचे कपडे असल्याची चर्चा आहे.

प्राचार्य प्रा. राहुल गदळे यांच्या तक्रारी वरून दि. २४ मार्च रोजी केज पोलिस ठाण्यात सात ते आठ अज्ञात चोरट्या विरुद्ध गु. र. नं. १४४/२०२४ भा. दं. वि. १४७, १४८, १४९ आणि ४५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाहॉक बाळराजे सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!