• Fri. Sep 18th, 2026

आजच्या अंतरवली सराठीच्या बैठकीतून जरांगे-पाटील यांचा निर्णय आला.

Bybaba maske

Mar 24, 2024

आजच्या अंतरवली सराठीच्या बैठकीतून जरांगे-पाटील यांचा निर्णय आला.

रोखठोक न्युज वार्ताहर

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटी येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती या बैठकीला राज्यभरातून अनेक समाज बांधव उपस्थित होते.

समाजाला ओबीसी नोंदी सापडलेल्या सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटलांनी लावून धरली. सरकारने मात्र १०% स्वतंत्र् आरक्षण देत समाजाची फसवणूक केली, असाही आरोप जरांगे पाटलांनी केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय करायचे यावर चर्चा केली. यावर जरांगे पाटलांनी समाजाला दोन मोठे पर्याय दिले आहेत .

या बैठकीत ते बोलतातना म्हणाले राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले १०%

आरक्षण ५० % च्या आत द्यावे, तरच सरकारने दिलेले आरक्षण स्वीकारू. तसेच त्यांनी मी निवडणुकीच्या भानगडीत पडणार नाही, असेही स्पष्ट केले. गावात जाऊन मराठा समाजसोबत बैठक घ्या, उमेदवार कोण द्यायचा हे निश्चित करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.लोकसभा निवडणुकीत सगळ्या जाती धर्माचे उमेदवार उभे करून राजकीय नेत्यांनी आपली जशी जिरवली तशी त्यांची जिरवा. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे तुम्हीच आरक्षण देणारे बना, असे आवाहन करत जरांगेंनी समाजाला दोन पर्याय दिले.

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत जर गावागावांतून अनेक उमेदवार दिल्यास मराठा समाजच अडचणीत येईल. मतांची विभागणी होईल त्यामुळे आपापल्या गावात जाऊन बैठक घेऊन जिल्ह्यातून एकच उमेदवार निश्चित करा आणि त्याला अपक्ष निवडणूक लढवायला लावा. किंवा सगेसोयरे कायद्याला ज्या पक्षाचा उमेदवार पाठिंबा देईल, त्याला पाठिंबा द्या. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे दोन पर्यायही जरांगे पाटील यांनी मराठा समाजासमोर ठेवले आहेत.

जरांगे पाटील म्हणाले. यावर सरकार मराठा समाजाला आरक्षण देत नसेल तर आरक्षण देणारे बणा. त्यासाठी ३० मार्चपर्यंत लोकसभेचे उमेदवार निश्चित करा, असे जरांगे पाटलांनी समाजाला आवाहन केले आहे. आता मराठा समाजाला कोण पाठिंबा देणार की समाज अपक्ष उमेदवार उभे करणार, याकडे लक्ष आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाचे असो किंवा विरोधी पक्षातील उमेदवार असोत यांच्यामध्ये जरांगे पाटलाच्या भूमिकेचा फायदा होतो की तोटा होतो हे नंतर कळेलच त्यामुळे अनेकांची राजकीय गणितं बनणार की बिघडणार हे बघावे लागेल.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!