• Fri. Sep 18th, 2026

केज तालुक्यात युसुफवडगाव येथे पंकजा मुंडेंची गाडी अडवली !पोलिसांचा लाठीमार !!  

Bybaba maske

Mar 27, 2024

केज तालुक्यात युसुफवडगाव येथे पंकजा मुंडेंची गाडी अडवली !पोलिसांचा लाठीमार !!

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली.यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.पोलीस संरक्षणात मुंडे यांची गाडी बाहेर काढून देण्यात आली.

बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे या गेल्या आठवडा भरापासून प्रचाराला लागल्या आहेत.बुधवारी केज तालुक्यातील दौऱ्यावर असताना पावनधाम औरंगपुर येथील अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी पंकजा मुंडे गेल्या होत्या.

पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केज व युसुफवडगाव पोलिसांनी काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या.यापूर्वी साक्षाळपिंप्री येथे मुंडे यांच्या गाडीसमोर काही आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले होते,त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून केज मधील काही आंदोलकांना नोटीस दिल्या होत्या.

त्यानंतर बुधवारी पंकजा मुंडे यांच्या गाडीसमोर काही कार्यकर्ते जमा झाले,रस्त्यावर गाडी अडवत या आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आंदोलन केले.यावेळी आंदोलक ऐकत नाहीत हे लक्षात आल्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!