• Fri. Sep 18th, 2026

अल्पवयीन मुलीवर आत्याचार जिवे मारण्याची धमकी

Bybaba maske

Mar 31, 2024

अल्पवयीन मुलीवर आत्याचार, जिवे मारण्याची धमकी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांच्या यादीत अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. अशातच आता सातवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या केज तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच गावात राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नाही तर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारले जाईल, अशी धमकी देखील त्या आरोपीने पीडित मुलीला दिली.

पीडितेच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी अधीक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्याला आळा घालणे गरजेचे आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!