• Fri. Sep 18th, 2026

नातेवाईकांचा संशय खरा ठरला दत्तात्रय केदार यांच्या मृत्यू प्रकरणी तिघा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल अंगावर ट्रक घालून खून !

Bybaba maske

Mar 31, 2024

नातेवाईकांचा संशय खरा ठरला

दत्तात्रय केदार यांच्या मृत्यू प्रकरणी तिघा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

अंगावर ट्रक घालून खून !

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील पिंपळगाव ते विडा दरम्यान रस्त्यावर आढळलेल्या एका अनोळखी प्रेताच्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून प्रेताची ओळख पटल्या नंतर हा अपघात नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला होता. तो संशय खरा ठरला असून त्याला तिघांनी जेवण करण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावून त्यांच्या अंगावर व डोक्यावर ट्रक घालून जीवे मारून खून केला आहे. त्या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात तिघा विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २७ मार्च रोजी केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील दत्तात्रय केदार व त्यांची पत्नी सौ. सखुबाई केदार यांनी दुपार पर्यंत शेतातील काम करून घरी आले. दुपारी ३:०० वा. च्या सुमारास दत्तात्रय हे त्यांची नारेवाडी ता केज येथील बहीण उषाबाई चौरे यांना माहेरी आणण्यासाठी मोटार सायकलवर गेले होते. तेथून ते सायंकाळी ६:०० वा.च्या सुमारास त्यांची बहीण उषाबाई यांना घेवून घरी आले. 

त्या नंतर दत्तात्रय केदार हे पत्नी सखुबाई केदार हिला म्हणाले की, त्यांचा मित्र विलास केदार हा त्याची ट्रक घेवून गावात आला आहे. तो त्यांना म्हणत आहे की, आपण जालना येथे जावून ट्रक मधील माल खाली करून परत येऊ. तू माझे सोबत चल. असे त्याने पत्नीला सांगितले. 

त्यावर दत्तात्रय केदार यांची पत्नी त्याला म्हणाली की, तुम्ही त्याचे सोबत जावू नका, कारण सासरे यांचे उद्या मासीक आहे. त्यावर तिला म्हणाले की, जालना येथे जावुन वडीलांचे मासीकच्या वेळेस परत येतो ; नाही तर मग त्यांचे सोबत जावून जेवण करून लगेच घरी परत येतो. असे सांगून संध्याकाळी ७::०० वा. च्या सुमारास घरातून एकटेच निघून गेले. 

त्या नंतर अदाजे ८:०० वा. दरम्यान त्यांची बहीण ऊषाबाई यांनी तिच्या मोबाइल वरून भाऊ दत्तात्रय यांच्या मोबाईलवर फोन करून जेवण करण्यासाठी घरी म्हणून येण्यास सांगितले. तेव्हा दत्तात्रय हे म्हणाले “मी ५ ते १० मिनीटात घरी येतो. तुम्ही जेवण करून घ्या. असे म्हणाल्यावर सर्वजण जेवण करुन घरात झोपी गेले. त्यां नतर दुसरे दिवशी दिनांक २८ मार्च रोजी सकाळी पती दत्तात्रय यांचा मोबाइलवर आई उर्मिला केदार हिने फोन केला असता त्याचा मोबाईल बंद होता. म्हणून त्या नंतर त्यांनी गावातील विलास केदार याला फोन करुन दत्तात्रय कुठे आहे ? असे विचारले असता विलास केदार म्हणाला की, दत्तात्रय केदार हा माझ्या सोबत आलेला नाही, तो कोठे आहे? ते माहीत नाही. त्यावर पत्नी सखूबाई, भाऊ धनराज व आई उर्मीला यांनी दत्तात्रय यांचा आजुबाजुला गावात तसेच नातेवाइकांकडे शोध घेतला. परंतु दत्तात्रय मिळून आले नाहीत.

त्या नंतर दि. २९ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास दत्तात्रय यांची पत्नी, भाऊ व भावजई हे केज पोलीस ठाण्यात दत्तात्रय केदार हे हरवले असले बाबतची तक्रार देण्यासाठी आले होते. त्यावेळेस तेथील पोलीसांनी मला सांगितले की, दि. २८ मार्च रोजी सकाळी ८:०० सुमारास पिंपळगाव ते विडा जाणारे डांबरी रोडच्या बाजूला पिंपळगाव शिवारात एक बेवारस मयत व्यक्ती आढळूন आला आहे. त्याचे प्रेत सरकारी दवाखाना केज येथे शवगृहात ठेवण्यात आलेले आहे. त्यांनी मयताचा फोटो दाखवला. तो फोटो पाहून सदर मयत व्यक्ती ही दत्तात्रय संदीपान केदार वय ३५ वर्षे असल्याचे निष्पन्न झाले.

दरम्यान दत्तात्रय केदार याला विलास केदार व त्याचे साथीदार विकास मधुकर केदार आणि जिवाचीवाडी येथील परमेश्वर चौरे यांनी संगनमत करून दत्तात्रय केदार याला जेवणाच्या बहाण्याने नेऊन पिंपळगाव ते विडा रोडवर रात्री निर्मनुष्य ठिकाणी नेऊन त्याच्या डोक्यावरून व छातीवर ट्रक घालून खून केला. 

यात दत्तात्रय केदार याच्या डोक्याची टवकी फुटून त्यातून मेंदू बाहेर आला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर विलास केदार, विकास केदार व परमेश्वर चौरे हे बेपत्ता झाले आहेत.

या प्रकरणी मयत दत्तात्रय केदार याची पत्नी सखुबाई केदार हिच्या फिर्यादी वरून विलास केदार, विकास केदार आणि परमेश्वर चौरे या तिघांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. १६३/२०२४ भा. दं. वि. ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करीत आहेत.

————————————————-

खुनाचे कारण काय ? :- दत्तात्रय केदार यांचा ट्रक अंगावर घालून एवढ्या क्रूर पद्धतीने त्याचा खून केला. हे आरोपी ताब्यात घेतल्यास खुनाचे कारण स्पष्ट होईल.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!