• Fri. Sep 18th, 2026

त्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली. गप्पेवाडी येथील युवक, खून की घातपात झाल्याचा पत्नीसह नातेवाईकांचा संशय

Bybaba maske

Mar 30, 2024

त्या अज्ञात मृतदेहाची ओळख पटली

गप्पेवाडी येथील युवक, खून की घातपात झाल्याचा पत्नीसह नातेवाईकांचा संशय

रोखठोक न्युज वार्ताहर 

तालुक्यातील गप्पेवाडी येथील युवकाचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचा संशय पत्नीसह नातेवाईकांना केला आहे. बुधवार ( दि.२७ ) रोजी मयत दत्तात्रय संदीपान केदार हा आपल्या बहिणीला आणण्यासाठी नारेवाडी येथे गेला व तेथून तिला घेऊन गप्पेवाडी येथे आला. व मला माझ्या मित्रांनी जेवायला बोलावले आहे असे म्हणत बुधवार ( दि. २७ ) रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वतः ची मोटार सायकल न घेता मित्रांच्या गाडीवर बसून गेला होता, त्यांनी पिंपळगाव ते विडा दरम्यान घातपात करून डोक्यात टॉमी व मोठे दगड घालून डोक्याचा चेंदामेंदा करून टाकला होता आणि मयत दत्तात्रय हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मयताची ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करून टाकला होता. सदरील मयत हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी केज पोलिसांशी संपर्क साधून केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून केज येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवला होता. या घटनेतील मयताची ओळख पटावी म्हणून पोलिसांनी प्रेस नोट काढून मयताची ओळख पटविण्याचे आव्हान केले होते. तर केज तालुक्यातील गप्पेवाडी येथील दत्तात्रय संदीपान केदार हा दोन दिवसापासून बेपत्ता होता. शुक्रवार ( दि.२८ रोजी ) मयताची ओळख पटली . आणि पत्नीसह नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही. असा आक्रमक पवित्रा घेत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. अखेर पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महाजन, पोलिस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!