• Fri. Sep 18th, 2026

बाळासाहेब मस्के पंडित समर्थकात तुफान हाणामारी.

Bybaba maske

Mar 29, 2024

बाळासाहेब मस्के पंडित समर्थकात तुफान हाणामारी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

गेवराई दि 29 (वार्ताहार) रेवकी च्या ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आलेल्या कामात भ्रष्ट्राचार झाला असल्याची तक्रार पंचायत समिती कडे करण्यात आली होती त्याअनुषंगाने पंचायत समिती गेवराईचे चौकशी समिती रेवकीत गेल्यानंतर विजयसिंह पंडित यांचे समर्थक गोकूळ चोरमले व बीआरएस चे नेते बाळासाहेब म्हस्के यांच्यात तूबंळ हाणामारी झाली असल्याची माहिती आहे तसेच ही घटना आज (दि 29 मार्च) रोजी दूपारी दोनच्या दरम्यान घडली आहे.

 

याबाबद सविस्तर माहिती अशी की, रेवकी ग्रामपंचायत ही बीआरएस पक्षाच्या ताब्यात आहे तसेच बाळासाहेब म्हस्के यांच्या मातोश्री ह्या विद्यमान सरपंच आहेत तसेच या ग्राम पंचायतीत अनियमीतता तसेच अनेक रस्ते व ईतर कामात भ्रष्ट्राचार झाली असल्याची तक्रार माजी जिप अध्यक्ष विजयसिंह पंडित यांचे समर्थक गोकूळ चोरमले यांनी केली होती त्याच अंनूषगाने गेवराई पंचायत समितीची चौकशी समिती आज (दि मार्च) रोजी दूपारी दोनच्या दरम्यान रेवकीत गेली असता तक्रारदार गोकूळ चोरमले व बाळासाहेब मस्के यांच्यात हाणामारी झाली असल्याची माहिती असून यामध्ये दोघांनाही ईजा झाली असल्याची माहिती असून त्यांच्यावर बीडच्या जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत तसेच अद्यापर्यंत यामध्ये गुन्हा दाखल झाला नाही. तसेच चौकशी समितीच्या अध्यक्षा अभियंता सासवडे यांना संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!