• Fri. Sep 18th, 2026

वकील पत्र घेतल्याने महिला वकीलास चाकुने मारहाण केली

Bybaba maske

Mar 29, 2024

वकील पत्र घेतल्याने महिला वकीलास चाकुने मारहाण केली

रोखठोक न्युज वार्ताहर

अंबाजोगाईच्या न्यायालयाच्या गेटसमोर घडली घटना; तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल

आमच्या भावजईचे वकील पत्र का घेतले या कारणावरून एका महिला वकीलास न्यायालयाच्या गेटमध्ये आडवून सदरील महिलेस शिवीगाळ करत चाकुने कानावर मारहाण करून खिशातील १२०० रू. काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तीन आरोपी विरोधात अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपासना विजयसिंग परिहार या अंबाजोगाई कोर्टामध्ये वकीली करतात. आमच्या भावजईचे वकीलपत्र का घेतले म्हणुन त्यांना किशोर भानुदास भालेकर व

इतरांनी न्यायालयाच्या गेट समोर आडवत लाथा बुक्क्याने मारहाण करून त्यांच्या उजव्या कानाला चाकु मारला. तसेच लज्जा वाटेल असे कृत्यही करण्यात आले. या मारहाणीत त्या जखमी झाल्या. खिशातील १२०० रु ही काढुन घेतले. या प्रकरणी उपासना परिहार यांच्या फिर्यादीवरून आरोपी किशोन भानुदास भालेकर, अनिता भानुदास भालेकर, पदमिनी संभाजी जोगदंड (रा. सर्व सदर बाजार अंबाजोगाई) यांच्या विरोधात कलम ३२६, ३२७, ३४१, ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६,३४ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!