• Fri. Sep 18th, 2026

डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने दलित तरूणाला ऍसिड टाकून जाळले

Bybaba maske

Apr 8, 2024

डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने दलित तरूणाला ऍसिड टाकून जाळले

रोखठोक न्युज वार्ताहर 

लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दलित तरुणाचा मृतदेह ऍसिड टाकून जाळलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. डे नाईट ड्यूटी करण्यास नकार दिल्याने त्याला जाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सचिन लामतुरे असे या तरूणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मातंग समाजातील तरूण सचिन लामतुरे हा औसा रोडवर असणार्‍या लॉजमध्ये काम करत होता. मात्र त्याच्याकडे दिगांबर साबणे याच्यासह अन्य एकाने डे नाईट ड्यूटी कर, नाही तर उचल दिलेले पैसे परत कर म्हणून तगादा लावला. यावरून दोघांत भांडण झाले. यानंतर सचिन लामतुरे याचा मृतदेह ऍसिड टाकून जाळलेल्या अवस्थेत सापडलेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लातुरातील औसा रोडवरील एका लॉजवर सचिन राजू लामतुरे (२८, रा. निटूर, ता. निलंगा) हा काम करीत होता. दरम्यान, दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांनी सचिनला लॉजवर डे-नाईट ड्युटी करण्यासंदर्भात तगादा लावला. सचिनने त्यास नकार दिला. त्यावरून डे-नाईट ड्युटी कर, नाही तर उचल घेतलेले पैसे परत कर, या कारणावरून छत्रपती चौक ते कव्हा तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावर त्याचा खून करून मृतदेह अर्धवट जाळल्याच्या स्थितीत आढळून आला.

पोलिसांसमोर अनोळखी मृतदेह म्हणून ओळख पटविण्याचे आव्हान होते. परंतु शेवटचा कॉल रेकॉर्ड तपासले असता पूर्ण खूनाचा उलगडा झाला. याबाबत राजू बाबुराव लामतुरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर साबणे याच्यासह अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसी खाक्या दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. इतर दोन अनोळखी आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. त्यांनाही लवकरच अटक केली जाईल. अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करण्यात यश आले असल्याचे लातूरचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी सांगितले.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!