• Fri. Sep 18th, 2026

बीड जिल्ह्य़ात काँग्रेस ची भुमीका गुलदस्त्यात. राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना सोबत पण काँग्रेस गायब. केज व माकेगाव पुरता पक्ष निर्णय घेईना?

Bybaba maske

Apr 8, 2024

बीड जिल्ह्य़ात काँग्रेस ची भुमीका गुलदस्त्यात.

राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना सोबत पण काँग्रेस गायब.

केज व माकेगाव पुरता पक्ष निर्णय घेईना?

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभेची महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाला तरी बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रीय काँग्रेस ची भुमीका गुलदस्त्यात असल्याच दिसत आहे.काँग्रेस पक्षाच्या बीड जिल्याच्या खासदार रजनीताई पाटील यांची भुमीका कुठेच बीड जिल्ह्य़ात उघड झालेली दिसत नाही कारण त्यांच्या जिल्हाध्यक्ष सह कुठलेच पदाधिकारी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या सोबत दिसत नाहीत.

गेल्या शनिवारी बजरंग सोनवणे यांनी केज येथील मुक्ताई फंक्शन हाॅल येथे महाविकास आघाडीच्या सर्व समन्वयकांची बैठक घेतली यास काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख सह पदाधिकारी व केज येथील नगरपंचायत च्या उपनगराध्यक्ष सह सगळे नगरसेवक गैरहजर होते त्यामुळेच बीड जिल्ह्यात आता महाविकास आघाडी बरोबर काँग्रेस आहे का नाही हा संभ्रम आहे.

देशात, राज्यात काँग्रेस भाजप सारख्या पक्षाशी एकजूट होऊन लढत असताना, दोन दोन वेळेस खासदार केलेल्या रजनीताई पाटील अजून ही आपल्या होमपिच वर कोणतीच भुमीका नाही.किंवा आता पर्यंत कुठल्याच पदाधिकाऱ्यांना आदेश नसल्याने पदाधिकारी संभ्रमात आहेत.

अगोदर नगरपंचायत मध्ये जनविकास परिवर्तन आघाडीला घेतलेल्या निर्णया मुळे शहरात व पदाधिकाऱ्यांत मोठ्या प्रमाणावर नाराजी असताना.लोकसभेची तुतारी वाजली असताना पाटलांच काहिच ठरत नसल्याने आता जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहे.महाविकास आघाडीकडून सर्वसमावेशक उमेदवार चर्चे अंती दिला आहे त्यामुळे पाटील काय भुमीका घेतात का शरद पवारांना आदेश द्यावा लागतो हे बघावे लागेल.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!