• Fri. Sep 18th, 2026

गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या. 

Bybaba maske

Apr 8, 2024

 गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील येवता येथील शेतकऱ्यांने आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की दिलीप विष्णूपंत जोगदंड हे आज पहाटे उठून दररोजच्या नित्य नेमाने शेतात जाऊन जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते.परंतु  त्यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे हि वार्ता गावात कळताच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून व पोलीस प्रशासनाला पाचारण करून त्यांना सोडून शवविच्छेदन करण्यासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करुन शवविच्छेदन क्रिया करून त्यांच्या वर गावातच अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. परंतू आत्महत्या केल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही सदरील तपास केज पोलीस हे करत आहेत.घटनास्थळी विडा बिटचे बिट जमादार वाघमारे यांनी पंचनामा केला आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!