• Fri. Sep 18th, 2026

ट्रक खाली कार घुसली, भीषण अपघात एक जागीच ठार.एकास उपचारा साठी लातूर ला हलवले.

Bybaba maske

Apr 9, 2024

ट्रक खाली कार घुसली, भीषण अपघात चालक जागीच ठार.

एकास उपचारा साठी लातूर ला हलवले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज पासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरेगाव फाट्यावरील पुलाच्या अलीकडे ट्रक व कारचा पहाटेच्या वेळी भीषण अपघात झाला. यामध्ये चालक गणेश त्रिंबक गांवडे वय 48 रा.मलकापूर हरिकिरण सोसायटी जि.बुलढाणा जागीच ठार झाला आहे तर सुखदेव बंडू ठोकर वय 55 जखमी झाला असून त्याला पुढील उपचारा साठी लातूर येथे हलवले आहे 

केज मांजरसुंबा रोडवरील कोरेगाव पाटीजवळ असलेल्या पुलाच्या अलीकडे वळणावर पहाटेच्या सुमारास टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक आणि कारचा अपघात झाला. सदरील अपघातात कार ट्रकच्या पूर्णपणे खाली अडकून पडलेली आहे. आणि त्यामध्येच चालकही दबलेला आहे. तर अन्य एक जण उपचारासाठी तिथून हलवण्यात आला आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच 108 चे डॉ. शाखेर शेख व पायलट अर्जुन बारगजे हे घटनास्थळी पोहोचले परंतु चालक हा पूर्णपणे कार मध्ये अडकला असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे.दरम्यान सदरील अपघात नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसली तरी अपघातातील मृत आणि जखमी हे मलकापूर जिल्हा बुलढाणा  असल्याचे त्या ठिकाणी बोलल्या जात आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!