• Sat. Apr 18th, 2026

आज बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार जयंत पाटील,रजनीताई पाटील व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार  

Bybaba maske

Apr 21, 2024

आज बजरंग सोनवणे उमेदवारी अर्ज दाखल करणार

जयंत पाटील,रजनीताई पाटील व महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार

-रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड :-बीड लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे आज सोमवारी त्यांचे ग्रामदैवत असलेल्या सारणी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. रजनी पाटील व किशोर पोतदार यांच्यासह इंडिया आघाडीच्या आजी माजी खासदार, आमदार, प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

      राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे हे आज सोमवारी (दि.२२) सकाळी ८:०० वाजता त्यांचे जन्मस्थळ सारणी (आनंदगाव) येथील ग्रामदैवत हनुमानाचे दर्शन घेवून सकाळी ८:३० वाजता आनंदगाव (सारणी) येथील ग्रामदैवत खंडोबाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता रामवडगाव येथे प्रभू श्री रामचंद्र मंदिरात दर्शन घेतील. सकाळी ९:३० वाजता हनुमंत पिंपरी येथे उत्तरेश्वर मंदिरात दर्शन घेवून चाकरवाडीकडे जाणार आहेत. सकाळी १० वाजता चाकरवाडी येथे संत श्री माऊली महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून

सकाळी ११:०० वाजता बीड येथील राष्ट्रवादी भवनामध्ये उपस्थित राहणार आहेत. 

       दुपारी १ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य खासदार सौ. रजनीताई पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बीड जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार आणि इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट , राष्ट्रीय काँग्रेस, आप, पँथर्स रिपबलिकन पक्ष, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया , समाजवादी पार्टी, शेकाप, भाकप, माकप या सर्व मित्र पक्षांचे आजी-माजी आमदार व खासदार, जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशन पत्र ) सादर करणार आहेत 

      यानंतर दुपारी १.३० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि प्रमुख पदाधिकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस भवन बीड येथे उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!