• Sun. Apr 19th, 2026

अंबेजोगाईच्या दवाखान्यात दोन गटात तुफान हाणामारीत 8 गंभीर जखमी  स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला आले छावणीचे स्वरूप! पोलिसांच्या कडे कोट बंदोबस्तात उपचार सुरू!

Bybaba maske

Apr 22, 2024

अंबेजोगाईच्या दवाखान्यात दोन गटात तुफान हाणामारीत 8 गंभीर जखमी 

 

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला आले छावणीचे स्वरूप!

पोलिसांच्या कडे कोट बंदोबस्तात उपचार सुरू!

रोखठोक न्युज वार्ताहर 

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात व रूगणालयात अपघात विभागात दोन गटात तुफान मारामारी झाली तेथील सुरक्षारक्षकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.

अंबाजोगाई नगरीत आंनद नगरी हे लहान, मोठ्या साठी विरंगुळा म्हणून राहटपाळणे विविध खेळाचे, पदार्थाचे दुकाने असलेला समुह अंबाजोगाईत आंनद नगरी म्हणून आला आहे.या समोरी दोन गटात मारामाऱ्या झाल्या त्यानंतर ते उपचारार्थ सरकारी रुग्णालयात गेले तिथे हे दोन्ही गट पुन्हा आमने सामने आले व पुन्हा अपघात विभागात दोन गट एकमेकांना भिडले व तुफान हामामारी चालु झाले.

त्यात तेथील डाॅक्टर, नर्सेस व कर्मचारी जिव मुठीत घेऊन बसले , तिथे उपचारार्थ असलेले पेशंट घाबरून गेले अश्यातच तेथील सुरक्षारक्षकाने मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्याना चांगलाच चोप दिला तेंव्हा कुठे परस्थिती नियंत्रणात आली. 

त्या नंतर पोलीसांनी येऊन मोर्चा सांभाळला असून सध्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाला पोलीस छावणीचे रूप आले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!