• Sun. Apr 19th, 2026

‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल.

Bybaba maske

Apr 29, 2024

‘या’ तारखेपर्यंत लागणार दहावी-बारावीचा निकाल.

रोखठोक न्युज वार्ताहर 

यावर्षी दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी तर बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. सर्व विद्यार्थी निकालाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. अशातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी तर बारावीचा 25 मे ला लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा पार पडणार आहे. दरम्यान, बोर्डाकडून दररोज उत्तरपत्रिका तपासणीचा आढावा घेतला जातोय. प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर यापूर्वी नोंदवून ठेवले आहेत. सध्या उत्तरपत्रिका तपासून जशा पूर्ण होतील तसे गुणपत्रिका तयार होत आहेत.

यंदा परीक्षेसाठी झालेल्या विद्यार्थी नोंदणीतून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या दर वर्षीच्या तुलनेत वाढली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याची माहिती राज्य मंडळाकडून घेतला जात आहे. दरम्यान, अगोदर निकाल ऑनलाइन माध्यमातून जाहीर केले जाणार आहे. त्यानंतर ते विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा आणि कॉलेजमध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!